पालघर: वसई मोहिमेच्या सोनेरी विजयानंतर जिल्ह्यात मराठ्यांचे उत्सव सर्वत्र सुरु झाल्यानंतर आपल्या गड किल्यांचे संवर्धन करण्याचे कार्य ‘किल्ले वसई मोहीम’ मागील तेरा वर्षा पासून करीत आहे. आज केळवे संवर्धन मोहिमेचे योगेश पालेकर यांच्या हस्ते केळवे येथे पारंपरिक वेशभूषेत विजय दिन साजरा करण्यात आला.सन १७३९ मध्ये वसई मोहिमेच्या सोनेरी विजयानंतर पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यासह परिसरातील गड किल्ल्यावर, गावागावात मराठ्यांचे मानाचे उत्सव सुरु झाले. ह्यावेळी पोर्तुगीजासह, ब्रिटिशांनी हिंदूंच्या गडकोटा वरील वास्तू, देवदेवतांची मंदिरे नष्ट केली होती, त्यांची पुर्नस्थापना करण्यात आली. व गावागावातून देवतांच्या पालखी मिरवणूका, देवीचा गोंधळ आदी उत्सव पुन्हा सुरु झाले. त्यानंतर ब्रिटिशांच्या आदेशाने मराठी सणावर बंदी आणण्यात येऊन गाडे किल्ल्यांची नासधूस करण्यात येऊ लागली. परिणामी पुन्हा पालखी मिरवणुका बंद पडण्याची अवस्था निर्माण झाल्यानंतर चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांचे जुलमी शासन पूर्ण नामशेष केले. त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या इतिहासाचे वंशज म्हणून गडेकोटांचे संवर्धन आणि उद्वस्त होऊ पहात असलेल्या देवतांची पूजा अर्चा आणि पालख्या साजरा करण्याची जबाबदारी प्रत्येक स्थानिक हिंदू धर्मीयांवर येऊन ठेपली.‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत सन २००३ पासून प्रत्येक वर्षी गडकोटावर विजय उत्सव, संवर्धन मोहीम, पालखी उत्सव साजरा करण्याची मोहिमेला प्रारंभ झाला. ह्याच मोहिमेचा एक भाग म्हणून ह्यावर्षी पहिल्या टप्प्यात वसई किल्ला ते केळवे जंजिरा किल्ल्या दरम्यान होणाऱ्या ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ चा मान वसईतील अर्नाळा गावास मिळाला. तर आज दुसर्या टप्प्यात ह्या पालखीचा मान जेष्ठ शिवप्रेमी शेखर (मामा) फरमन, भिवंडी आणि केळव्याच्या योगेश पालेकर ह्यांना देण्यात आला होता. त्यामुळे केळवे संवर्धन मोहिमेच्या शेकडो दुर्गप्रेमींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत हातात भगवे झेंडे,ढोलताश्यांच्या गजरात केळवे गावात मिरवणूक काढली.आण िविजयदुर्ग गडावर जात विजय दिन साजरा केला.
वसई नंतर आता ‘मिशन केळवे संवर्धन’
By admin | Published: January 11, 2017 5:56 AM