शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

काळूू धरणविरोधातील आंदोलन अधिक तीव्र, दलालांना घडवणार अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 06:29 IST

दलालांना घडवणार अद्दल : शेतकरी संघर्ष मंच सक्रिय; ४१ गावच्या ग्रामस्थांची तयारी सुरू

सुरेश लोखंडेठाणे : मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी मुरबाड तालुक्यात काळू धरण बांधण्यात येणार आहे. परंतु, बनावट डिझाइन, बनावट धरणाचे काम सुरू केल्याच्या मुद्यावरून या धरणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीदेखील सरकार धरणासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करून त्याविरोधात लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करण्याची तयारी संबंधित ४१ गावांच्या ग्रामस्थांनी सुरू केली आहे. याशिवाय, धरण क्षेत्रातील जमीनविक्री करणाऱ्या दलालांनाही कायमची अद्दल घडवण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहे.

आंदोलनाची आगामी रणनीती ठरवण्यासाठी दिघेफळ येथे बुधवारी काळू धरणविरोधी शेतकरी कष्टकरी व भूमिहीन समुदाय मंचची बैठक पार पडली. शासनाने कितीही दडपशाही अवलंबली, तरी आता मागे सरणार नाही. उलट, अधिक ताकदीने संघर्ष उभा करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. रास्ता रोको करा, असे चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव देखमुख यांनी ४१ गावांतील शेतकºयांना मार्गदर्शन केले. धरण क्षेत्रातील जमीनविक्री करून दलाली कमावणाºया परिसरातील दलालांचा समाचार घेण्याचेदेखील यावेळी सुरेश देशमुख यांनी सांगितले. तर, खरेदी केलेल्या जमिनी शेतकºयांना पुन्हा मिळवून देत हक्काचे रक्षण करण्याचे धोरण या पुढील आंदोलनात स्वीकारणात येणार असल्याचे काळू धरणविरोधी शेतकरी मंचचे सक्रिय कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी सांगितले. काळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसतानाही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनझाडाझडती घेण्यात आली. त्याआधी बनावट डिझाइन व नकाशाद्वारे बांधकाम हाती घेतलेल्या या धरणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.धरणावर ११२ कोटी खर्चाची बनवाबनवीया धरणावर सुमारे दीड ते दोन वर्षांत ११२ कोटी खर्च झाल्याचे बोलले जात आहे. सुमारे २० टक्के काम झाल्याचे सांगितले जात असतानाच पाटबंधारे विभागाच्या काही अभियंत्यांसह ठेकेदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चक्र व्यूहात अडकले आहेत. मुळात या धरणाचे लॅण्ड अ‍ॅक्विझिशन झालेले नसल्याचे सांगितले जात आहे. वनविभागाची मान्यता नाही. आठ ग्रामपंचायतींचे बोगस ठराव असल्याचे न्यायालयाने आधीच उघड केले आहे. नवीन कायद्यानुसार या धरणामुळे होणारे ‘सामाजिक परिणाम’ अहवाल अद्यापही तयार नाही. नष्ट होणाºया वनसंपदेबाबत वनखात्याची सहमती नाही. यामुळे या धरणाच्या कामाविरोधात जनहित याचिका दाखल करत श्रमिक मुक्ती संघटनेने स्थगितीदेखील मिळवलेली आहे. तरीदेखील प्रशासनाकडून छुप्या मार्गाने दडपशाही सुरू असल्याची चर्चा या बैठकीत झाली. यामुळे काळू धरणविरोधी आंदोलन पुन्हा पेट घेण्याची शक्यता दिसून येत आहे.काळू धरणात जाणार दोन हजार १९९ हेक्टर जमीन : धरण क्षेत्रात ठिकठिकाणी बैठका घेऊन ४१ गावांमधील सुमारे १८ हजार गावकºयांना जनआंदोलनासाठी तयार केले जात आहे. संभाव्य काळू धरण दोन हजार १९९ हेक्टर शेतजमिनीसह वनजमिनीवर बांधले जाणार आहे. पण, अद्याप महसूल विभागाकडून या जमिनीचे संपादनही केलेले नाही. धरणाचे मूळ डिझाइन, आदी नाशिकच्या सरकारी इन्स्टिट्यूटचे कोणतेही नकाशे नसतानाही या धरणाचे काम एफे कन्स्ट्रक्शन्स कंपनीने सुरू केले होते. त्याविरोधात उच्च न्यायालयाने या धरणाच्या कामास स्थगिती दिली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारDamधरण