जव्हार : गेल्या दीड वर्षांपासून जव्हार वन विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्थानिक आदिवासींच्या वन हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे कारण देत विविध मागण्या घेऊन कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या अध्यक्षतेखाली जुना राजवाडा येथून थेट उपवन संरक्षण कार्यालयात मोर्चेकऱ्यांनी धडक दिली. त्या ठिकाणी निदर्शने करून वन खात्यातील उपवनसंरक्षक मिश्रा व संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत मोर्चाने थेट पोलीस ठाणे गाठले व गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला.
नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही. आदिवासी लोक इतक्या शांतपणे मोर्चा करतात हे मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच पाहिले असून मीही आपले आभार मानतो असे त्यांनी सांगितले.कष्टकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुम्ही आदिवासींना शिंदाड करू देत नाहीत.
शिंदाड करणे हे महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ चे उल्लंघन करते असा तुम्ही आरोप करता; परंतु तुमचे म्हणणे साफ चुकीचे असून शिंदाड व राब करणे हा आमचा पारंपरिक हक्क आहे. हा हक्क आम्हाला वन हक्क कायद्याने निहित करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र वन नियम २०१४ मध्ये आमचा हा हक्क मान्य करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी १९३५ मध्ये देऊ करण्यात आलेल्या सवलतींमध्ये राब करण्याचा समावेश आहे. आम्हाला वन पट्ट्यामध्ये विहिरी बांधू देत नाहीत व जमिनीचे सपाटीकरण करू देत नाहीत, अशा तक्रारी या वेळी करण्यात आल्या.
रोजंदारी, कंत्राटी कामगारांना न्याय द्याजव्हार : जव्हारच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रोजंदारीवर काम करणाºया सफाई कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार नाही. या कामगारांना पगारवाढीबरोबरच भविष्यनिर्वाह निधी आणि भत्ते देण्यात यावेत, या मागण्यांसाठी सफाई कामगारांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली रुग्णालयासमोर शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
रोजंदारी, कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जव्हारच्या ग्रामीण कुटीर रुग्णालयात १४ ते १५ वर्षांपासून (रोजंदारी) कंत्राटीवर काम करीत आहेत. मात्र या कंत्राटी (स्वच्छता सेवा) सफाईगार व शिपाईगार यांना मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था बोईसर यांनी भरती केले आहे, मात्र त्यांनी गेल्या काही वर्षांपासून पगारवाढ होत नाही. इतर भत्ते मिळत नाहीत. म्हणून या कर्मचाºयांनी मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्थेकडे मागणी केली. परंतु या संस्थेने कर्मचाºयांचे कुठलेही म्हणणे न ऐकता उलट त्या कर्मचाºयांना कमी करण्यात आले आहे. रुग्णालयात रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी वैतागले असून त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे.