हितेन नाईक, पालघरराज्याचा कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत एक परीक्षार्थी ठाणे आणि औरंगाबाद या दोन वेगवेगळ्या केंद्रात एकाच दिवशी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याची घटना समोर आली आहे. या नोकर भरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करून या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी हर्षला पाटील या परीक्षार्थीनी केली आहे. लवकरच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आणि एकच वेळी झालेल्या कृषी सेवक भर्तीचा निकाल सहा कृषी विभागाच्या वेबसाइटवर नुकताच जाहिर करण्यात आला होता. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सर्व विभागात एकाच दिवशी व एकाच वेळेत परीक्षा घेण्यात आली असताना ठाणे व औरंगाबाद या दोन विभागात कृषीसेवक पदासाठी निवड झालेल्या विशाल उखा पाटील या उमेदवाराचे नाव दोन्ही केंद्रावर आल्याचे दिसून आले आहे.काही जिल्ह्यात परीक्षे दरम्यान मायक्रो हेडफोन लाऊन गैरप्रकार केले जात आसल्याचे निदर्शनास झाले आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही लावून परीक्षा व्हायला हवी असे परीक्षार्थींनी बोलताना सांगितले.प्रश्न पत्रिका बनविताना ही सीसीटीव्हीङ्क कैमेऱ्याच्या देखरेखीखाली व्हायला हवी. परीक्षा झाल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसांच्या आत सर्व उमेदवारांचे गुण जाहिर करण्यात यावेत आदी मागण्या या परीक्षार्थिनी केल्या असुन ही परीक्षा रद्द करून नव्याने व पारदर्शक पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी होत आहे.या परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही परीक्षा पारदर्शक पणे राबवली गेली नसल्याचा आरोप ही काही परीक्षार्थिनी केला आहे. तर काही भागात प्रश्न पत्रिका फुटल्याची चर्चा असूंन एका पदा साठी १४ लाख रुपयाची मागणी काही दलाला मार्फत करण्यात आल्याचीही चर्चा सध्या परीक्षा दिलेल्या उमेदवारात रंगली आहे.कोकणाबाहेरील प्रश्न का?कृषीसेवक हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा व्यक्ती असतो. मग प्रत्येक विभागानुसार त्या त्या विभागात पिकणाऱ्या पिकांबाबत प्रश्न विचारले जाणे अत्यावश्यक व गरजेचे असताना मात्र कोकण विभागातील प्रश्नपत्रिकेत कोकणा बाहेरील पिकांचे प्रश्न कशासाठी देण्यात आले होते असा मुद्दा परिक्षार्थ्यांनी उपस्थित केला आहे.महाराष्ट्रात एकाच दिवसात एकाच वेळेस परीक्षा झाली आसताना एक उमेदवार दोन्ही विभागात कसा मेरिटला येऊ शकतो म्हणजे जे निवड झालेत त्यांच्या मागे खुप मोठ अर्थ कारण लपल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नोकर भरती प्रक्रि या रद्द करून ती पारदर्शक पणे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अनेक जिल्ह्यात भरती प्रक्रि या दरम्यान अनेक गैरप्रकार झल्याचे उघडकीस आले आहेत...
कृषी सेवक परीक्षा प्रकरण उच्च न्यायालात
By admin | Published: September 09, 2016 2:31 AM