शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:37 AM

किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे.

- अनिरुध्द पाटीलबोर्डी - किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे हा बैलांचा सौदा करण्याची पद्धती शेतीला पूरक असून दोन्ही शेतकरी कुटुंबाकरिता फायदेशीर ठरत आहे. यंदा एका बैलाचा मोबदला दोन हजार रु पये आहेत.तालुक्यात खरीप हंगामातील भात लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून तालुक्यातील शेतीचे समुद्रकिनाºयालगत आणि डोंगरीपट्यातील अशी ढोबळमानाने दोन प्रकारची वर्गवारी करण्यात येते. किनाºयालगतची जमीन सपाट असल्याने चिखलणीसाठी पूर्वी बैलांचा तर हल्ली पॉवर टीलरचा वापर केला जातो तर डोंगराळ भागात खडकाळ आणि उतरणीची जमीन असल्याने येथे यांत्रिक शेतीला मर्यादा असून आजही बैलांच्या माध्यमातून शेती होते.दरम्यान पावसाळ्यात किनारी भागात पेरणी आणि लावणी वगळता बैलांचा वापर होत नाही. शिवाय शेत व पाणथळ जमिनीमुळे जनावरांकरिता गुरचरणाकरिता मर्यादा येतात. त्यांच्या संगोपनाकरिता मनुष्यबळ, वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागतो. त्यामुळे शेतीला आवश्यक जनावरांच्या व्यतिरिक्त अन्य जनावरांचे संगोपन करणे हा शेतकºयांपुढे प्रश्न असतो. उलटपक्षी डोंगरी भागात खाद्याची मुबलकता अधिक असून त्यांना बैलांची आवश्यकता असते. त्यामुळे किनारपट्टीतील शेतकºयांचे बैल या चार महिन्यांकरिता काबाडाकरिता घेऊन त्या बदल्यात पैसे, धान्य वा पावळी देण्याचा सौदा करण्याची येथे शतकीय परंपरा दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे या दोन भागातील कुटुंबियांमध्ये स्नेहाचे वातावरण तयार होते.डी प्लस झोनचा फायदा फक्त उकळलाजून महिन्याच्या प्रारंभी डोंगरपट्टीतील अनेक आदिवासी शेतकरी बैलांच्या शोधात किनारी भागात येतात. येथून बैल घेऊन गेल्यावर त्यांच्याकडून पेरणी व लावणीकरिता चिखलणीची कामे करून घेतली जातात. या ठिकाणी पाठविले जाणारे बैल उखळणीच्या कामाकरिता अप्रशिक्षित असल्याने तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा बैल येताना धण्याकरिता पैसे, भात किंवा पावळी घेऊन येत असल्याने त्याचे जंगी स्वागत होते. पाहुणा खूप दिवसांनीं माघारी परतल्याने या शेतकरी कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरारलेले असते. तर त्याच्या सान्निध्यात एवढे महिने घालविल्याने त्याला माघारी सोडताना त्या शेतकºयांची मनस्थिती भावूक झालेली असते. यावेळी शेजारचे दोन्ही शेतकºयांची समजूत घालतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार