शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘नोटा’ची सर्वच पक्षांच्या उमेदवारांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:14 PM

पोटनिवडणुकीत टक्का १६ हजारांवर; राजकीय पक्षांवर अंतर्मुख होण्याची वेळ

बोईसर : लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या २०१४ व २०१८ च्या पोटनिवडणुकी बरोबरच २०१४ साली पालघर लोकसभेच्या क्षेत्रातील सहाही विधानसभा निवडणुकीमध्ये वरील पैकी कोणीही नाही नोटा (नन आॅफ द अबॉव्ह) या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने सर्वच राजकीय पक्ष व संघटना तसेच अपक्ष निवडणूक लढवीणाऱ्या उमेदवारांनी त्याची धास्ती घेतली आहेलोकसभेच्या मे २०१४ साली घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये सुमारे ९ लाख ९२ हजार ७७० मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये २१ हजार ९७७ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला तर मे २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये ८ लाख ८६ हजार ८७३ मतदारांनी मतदान केले त्यापैकी १६ हजार ८८४ मतदारांनी नोटा पर्यायचा वापर केला होता तर २०१४ साठी विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभा मतदारसंघात ३१२६ (१.८ टक्के) , नालासोपारा १८९८ (०.८४टक्के), विक्रमगड : ४१८८ (२.५टक्के), पालघर : २९८७ (१.८२टक्के) ,वसई : २९९४ (१.५५ ट्क्के) , डहाणू : ४४९८ (२.९० टक्के)असे एकूण १९ हजार ६९१ मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला होता.२८ मे २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये ५१.२८ टक्के मतदान झाले होते. त्या अत्यंत अतितटीच्या व प्रतिष्ठेच्या आणि राज्य व देशपातळीवरील राजकीय पक्षांच्या नजरा लागलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला होता. त्याच निवडणूकी मध्ये १६ हजार ८८४ नोटा पर्यायाची होती म्हणजेच विजयी (मताधिक्यची) मतांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मत नोटा पर्यायाची होती जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार निवडणूक रिंगणातील उमेदवारांना नाकारत असतील तर ही खुप गंभीर बाब आहे.लोकशाहीत सर्वसामान्य मतदारांना मतदान रु पी एक मोठी शक्ती दिली आहे. पाच वर्षांनी होणारी निवडणूक ही डोळसपणे विचार करायला लावणारी असते आपला लोकप्रतिनिधी कसा असावा त्याच्याकडून आपल्या अपेक्षांची पूर्तता होते का होत नसेल तर त्याला आपण पर्याय निर्माण करायला हवा नवीन व लायक माणसाला संधी द्यायला हवी लोकशाही अधिक प्रकल्प कशी होईल याचा विचार होणे आवश्यक आहे.भारतीय लोकशाही जगात अधिक प्रगल्भ व मजबूत आहे लोकशाहीत लोकप्रतिनिधि पर्यायाने सरकार मतदाना द्वारे निवडून दिले जाते त्या मुळे मतदान ही खरी ताकद आहे म्हणून निवडणूक कोणतीही असो मतदारांनी आपला हक्क आणि कर्तव्य प्रामाणिकपणे जपायला हवीत

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर