लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या विरोधात शिक्षकांनी न्यायालयात धाव दाद मागितली असता २२ जुलै २०१६चा शासन आदेश रद्द करून त्या आधीच्या २९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार सर्वच जि.प. कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे ठाणे, पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमधील शिक्षकांसह अन्य कर्मचाºयांच्या बदल्या आता बिंदु नामावलीप्रमाणेच कराव्या लागत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग बदल्यांच्या याद्या करण्यात गुंतले आहेत.बिंदुनामावलीनुसार बदल्या नको असल्यामुळे शिक्षकांसह कर्मचाºयांनी राजकीय पुढाºयांव्दारे नवीन आदेश काढण्यात यश मिळवले होते. यामुळे मागील वर्षी २२ जुलैचा आदेश काढून त्यात कनिष्ठ कर्मचाºयांच्या बदलीला प्राधान्य दिले होते. यामुळे अन्याय झालेल्या काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने हा आदेश रद्द करून २९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार सर्व कर्मचाºयांच्या बदल्या कराव्यात आदेश जारी केले. यामुळे आता शिक्षक, लिपीक, सेवक आदी सर्वांच्या बदल्या बिंदुनामावलीनुसार ठाणे व पालघर जिल्हा परिषदेला कराव्या लागत आहेत.ठाणे व पालघर जिल्ह्यात कर्मचारी संख्या समान ठेवण्यासाठी आता बिंदुनामावलीनुसार बदल्या करण्यासाठी दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. या बिंदुनामावलीनुसार ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३५० शिक्षकांच्या बदल्या पालघरला होणार आहेत, तर अन्य सुमारे ४७९ कर्मचारी या बदल्यांसाठी पात्र आहेत.आदिवासी क्षेत्रात काम करणे आवश्यक असल्यामुळे या बदल्यांमध्ये सेवानिवृत्तीस आलेल्या कर्मचाºयांचाही समावेश होत आहे. सुमारे २०० पेक्षा अधिक महिलांचाही यात समावेश आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर जिल्हा अस्तित्वात आला. मात्र, नव्या पालघर जिल्ह्यासाठी रिक्त पदांवर अद्यापही भरती करण्यात आली नाही.अनेक कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या खटपटीतराज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये अध्यादेश काढून दोन्ही जिल्ह्यात समान पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बिंदुनामावलीनुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ कर्मचाºयांच्या पालघरमध्ये बदल्या झाल्या आहेत. त्यातील बहूसंख्य कर्मचारी कल्याण ते बदलापूरपट्यातील रहिवासी आहेत. या बदल्यांमधून वय ५३ वर्षे, पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, अपंग वगळण्यात आले. मात्र, माजी सैनिक व परित्यक्त्या, विधवा कर्मचाºयांचाही या बदल्यांमध्ये समावेश आहे. दररोजच्या किमान पाच ते सहा तासांच्या पालघरच्या प्रवासाला कंटाळून अनेक कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीच्या प्रयत्नात आहेत.
सर्वच बदल्या आता बिंदू नामावलीनुसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:04 AM