पालघर : नगर परिषद निवडणुकीत विरोधक विकासावर राजकारण करण्यात अपयशी ठरल्याने सांगत त्यामुळेच त्यांच्याकडून वयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोप-प्रत्यारोप करणे हे निवडणुकीतील शस्त्र आहे. मात्र, नागरिक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत असेही ते म्हणाले.पालघरच्या विकासासाठी नगरविकास आणि एमएमआरडीए या विकासाच्या डबल इंजिनाच्या माध्यमातून विकास साधण्याची संधी पालघरवासीयांपुढे असून पालघर नगरपरिषद जिंकून आपल्या सत्तेचे हात बळकट करा, मग एकत्र काम करून शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर वासीयांना दिला.पालघर नगरपरिषदेसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार असून नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या डॉ. श्वेता मकरंद पाटील व अन्य महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्याची सभा पालघर मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी सेना युवानेते आदित्य ठाकरे, बांधकाम आणि आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. रवींद्र फाटक, पास्कल धनारे, जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, ज्योती ठाकरे, श्रीनिवास वणगा, विजय चौगुले, ज्योती मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. शहरात घनकचरा व्यवस्थापन होत नसल्याने डासांची पैदास, डेंग्यू, भुगर्भातील पाणी व शेती खराब झाली आहे. शहरातील घाण पाण्याने ९० टक्के तर उद्योगामुळे १० टक्के प्रदूषण होते. राज्यात शंभराहून अधिक शहरात घनकचरा व्यवस्थापन सुरू केले आहे. शहरांचा डीपीआर पाठवल्यास निधी दिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. श्वेता पाटील या निवडणूक जिंकून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत सत्तेत आल्यावर घनकचरा व्यवस्थापन आराखडा तात्काळ तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. तर पालघर जिल्ह्यातील मुख्यालय दोन टप्प्यात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नाराजी नको म्हणून उमेदवारी गुलदस्त्यातमुंबई विद्यापीठाचे एक उपकेंद्र पालघरला स्थापून युवकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. तर दुसरीकडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपाची नाराजी ओढवू नये यासाठी शिवसेनेनेही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यानंतर भ्रष्टावादी काँग्रेस म्हणत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीवर निशाणा साधला. पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या उमेदवारी बाबत वाच्यता करण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले.
आरोप-प्रत्यारोप हे तर निवडणुकीतील शस्त्रेच! मुख्यमंत्र्यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:50 AM