- शशी करपेवसई : पोलिसांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणा-या अमित झा आत्महत्याप्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, याप्रकरणात वादाच्या भोव-यात सापडलेले पोलीस निरीक्षक युनुस शेख यांचीही बदली ठाणे ग्रामीण पोलीस दलात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.स्वत:ला पेटवून घेऊ़न आत्महत्या केलेल्या विकास झा या आपल्या भावाच्या प्रकरणात कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ अमित झाने विष पिऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी अमितने विरार पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक युनुस शेख यांच्यासह पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, विरारचे पोलीस उपअधिक्षक जयंत बजबळे या पोलीस अधिकाºयांची नावे घेतली होती. अमित झा याने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओही तयार केला होता. तसेच आत्महत्येपूर्वी पोलिसांना जबानीही दिली होती. त्यात त्याने पालघर पोलीस दलातील अ़नेक अधिकाºयांची नावे घेतली होती. मात्र, पोलिसांनी अ़र्नाळा पोलीस ठाण्यात फक्त युनुस शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात पालघर पोलीस अधिकाºयांची नावे घेतली गेल्याने तपास निष्पक्षपातीपणे व्हावा यासाठी तो राज्य गुप्त वार्ता विभागाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी झा कुटुंबियांनी केली आहे.अधीक्षकांचीच विनंतीपोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी याप्रकरणाचा तपास जिल्हया बाहेरील पोलिसांकडून व्हावा अशी विनंती विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्याकडे केली होती. त्यानुसार हा तपास ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक करीत आहेत.
अमित झा आत्महत्या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीणकडे, अधीक्षकांचीच विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 2:53 AM