मोखाडा : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून या गावातील ग्रामस्थांना गावाबाहेर पडण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.गावात एका ठिकाणी पूल आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी वन विभागाच्या विरोधामुळे पूलाचे खांब उभे करून अर्धवट अवस्थेत काम बाकी आहे. २०१४ पर्यंत पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर जाणे शक्य नव्हते. अगदी खूप आजारी रूग्ण असेल तर ग्रामस्थ डोलीतून ५ ते ६ किलोमीटरचे अंतर डोंगर चढून दवाखान्यापर्यंत घेऊन जायचे. या अर्धवट खांबाचा वापर करून ग्रामस्थ व आरोहन संस्थेच्या पुढाकाराने २०१४-१५ मध्ये साकव बांधण्यात आला होता. या साकवमुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांना ये-जा करता येत होती.मात्र अतिवृष्टीमुळे येथील भातशेती, भाजीपाला, मोगºयाची शेती वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले. आमले येथील ४० कुटुंंब गेल्या ३ ते ४ वर्षापासून मोगरा शेतीमधून उत्पादन घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सप्टेंबरपासून ते जून अखेरपर्यंत ५० ते ६० हजार रुपये मोगºयातून उत्पादन घेतात. अतिवृष्टीमुळे लोखंडी पूल वाहून गेल्यानंतर तातडीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन हा पूल पुन्हा उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले मात्र, ते हवेतच विरले आहे.>जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आमले गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ३ ते ४ वर्षांपूर्वी आरोहण संस्थेच्या माध्यमातून ४२ शेतकºयांनी मोगºयाची लागवड केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.-गणेश सरोदे, कार्यकर्ते, आरोहण>गावातील वृद्ध महिला, रु ग्ण विद्यार्थी यांचा या नदीतील जीवघेणा प्रवास बघून या गावातील तरुणांनी लाकूड आणि पाण्याच्या टाक्या यापासून एक तरफा तयार केला आहे. याच तरफ्यावरून ग्रामस्थांची सध्या ये-जा सुरू आहे. लोखंडी पूल वाहून गेल्याने येथील तरुणांवर बेरोजगारी ओढवली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड होत असून तयार झालेले उत्पादन गावाबाहेर न्यायचा कसा हा प्रश्न येथील तरु ण शेतकºयांसमोर आहे.- पांडुरंग वारे, स्थानिक>पुरामध्ये लोखंडी पूल वाहून गेल्याने आमचा इतर गाव, तालुक्याशी संपर्क तुटला आहे. रूग्णांना जंगलातून डोली करून घेऊन जावे लागते.-सोमनाथ किरकिरे,पोलीस पाटील
आमलेवासीयांना भोगाव्या लागत आहेत मरणयातना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:38 AM