शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

... आणि ‘त्या’ पित्याला मिळाला न्याय, ९३ वर्षीय वृद्धाने मागितली होती दाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:28 AM

वडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलाविरोधात माहीम येथील एका ९३ वर्षीय वृद्धाने प्रांताधिका-याकडे दावा दाखल केला होता.

- हितेन नाईकपालघर : आपली सर्व संपत्ती तसेच जमिनीची मुलांमध्ये वाटणी करून दिली. त्यानंतर वडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलाविरोधात माहीम येथील एका ९३ वर्षीय वृद्धाने प्रांताधिका-याकडे दावा दाखल केला होता. या वयोवृद्ध वडिलांना न्याय देताना वडिल आणि मुलगा या नात्याला कुठेही धक्का न लागू देण्यात प्रांताधिकारी विकास गजरे यांना यश आले. निर्णय देतानाच त्यांनी मुलालाही कर्तव्याची जाणीव करून दिली.माहीम येथील शेतकरी असलेले हे ९३ वर्षीय वडील १९४६ पासून मंडप डेकोरेटर्स चा व्यवसाय करीत होते. आपली पत्नी, दोन मुले आणि ४ मुली असा त्यांचा परिवार. मात्र, दोन्ही मुलांचे आपापसात पटत नसल्याने १९९५ मध्ये दोन्ही मुलांमध्ये शेती-वाडीचे विभाजन करून दिले. लहान मुलाच्या हट्टापायी मंडप डेकोरेटरचा व्यवसाय त्याला दिला. या व्यवसायातून मुलाने चांगले उत्पन्न मिळवले आणि तो आर्थिकदृष्ट्या सधन झाला. मात्र, आपल्या आईच्या निधनानंतर वडील रहात असलेल्या घराचे त्याने गोदाम केले. त्याच घरात मुलाने मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवले. हे सामान हटवण्यास सांगूनही मुलाने दाद न दिल्याने अखेर वडिलांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आपण दिलेल्या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करणारा मुलगा आपली देखभाल करत नसल्याची तक्र ार वडिलांनी २० जून २०१९ रोजी प्रांताधिकारी विकास गजरे यांच्या कार्यालयात करून प्रती महिना १५ हजार रुपये खर्चासाठी मिळावेत अशी मागणी केली होती.या प्रकरणी करण्यात आलेला अर्ज प्रांताधिकाºयांनी अंशत: मान्य केल्यानंतर तीन सुनावण्या पार पडल्या. आई - वडिलांनी दिलेल्या मालमत्तेसोबत आई - वडिलांचा सांभाळ नीट न केल्यास मालमत्तेचे हस्तांतरण लबाडीने किंवा गैरवाजवी प्रभावाने केल्याचे समजून असे हस्तांतर अवैध असल्याचे घोषित करण्याची तरतूद कायद्यात आहे. तसेच कलम २४ अन्वये वरिष्ठ नागरिकांची काळजी न घेतल्यास त्यांना ३ महिन्यांपर्यंत कारास किंवा दंड किंवा मग दोन्ही शिक्षा लागू होतात, याची पूर्ण कल्पना प्रांताधिकाºयांनी सदर मुलाला दिली. त्यामुळे मुलानेही आपल्या हातून नकळत घडलेल्या चुका मान्य केल्या. यावर प्रांताधिकारी विकास गजरे यांनी वडिलांचा सांभाळ करताना त्यांना कुठलाही त्रास देऊ नये.तसेच अर्जदार वडील यांना उदरिनर्वाह आणि औषधोपचारासाठी प्रत्येक महिन्याच्या १० तारखेआधी ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. यावर संबंधित पोलीस अधिकाºयांचे लक्ष राहणार आहे.मुलांनी पालनपोषण नाकारलेल्या कुठल्याही वृद्धांस कायद्यान्वये न्याय मागता येईल.कमीत कमी वेळेत न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील.-विकास गजरे, प्रांताधिकारी, पालघर

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय