वाडा : अंगणवाडी कार्यकर्त्यांना दरवर्षी दिवाळीला मिळणारी ^भाऊबीज यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकल्याने पालघर जिल्ह्यातील दोन हजार अंगणवाडी सेविका आणि दोन हजार मदतनीस अशा चार हजार महिला कर्मचाऱ्यांवर ऐन दिवाळीत आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले. दिवाळीनिमित्त यापूर्वी मिळणारी एक हजार रुपयांची भाऊबीज (बोनस) गेल्यावर्षीपासून दोन हजार रु पये करण्यात आली आहे.
मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तसेच अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करता आले नसल्याचे अधिकारी सांगतात. विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होती. निवडणुकीची आचारसंहिता २८ ऑक्टोबरपर्यंत असल्याने सरकारी कामकाज ठप्प होते.तर सोमवारी (२९ ऑक्टो.) शासकीय सुट्टी असल्याने मंगळवारी (३० ऑक्टो.) ला आलेल्या भाऊबीजेला अंगणवाडी ताईंना भाऊबीज देता आली नाही.आधीच अल्पसे मानधन घेणाºया अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेळेवर भाऊबीज मिळाली असती तर त्यांची दिवाळी अधिक गोड झाली असती. विनता देशमुख - उपाध्यक्षा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ