शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

नाराज निवृत्तांचा ५ जुलैला सरकारविरोधी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:03 AM

देशभरातील निवृत्तांना किमान निवृत्ती वेतन देण्या संदर्भात भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशी आमचे सरकार आल्यानंतर तात्काळ स्विकारल्या जातील हा भाजप नेत्यांचा शब्द सत्ता

पालघर : देशभरातील निवृत्तांना किमान निवृत्ती वेतन देण्या संदर्भात भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशी आमचे सरकार आल्यानंतर तात्काळ स्विकारल्या जातील हा भाजप नेत्यांचा शब्द सत्ता मिळाल्यानंतरही पाळला जात नसल्याच्या निषेधार्थ ईपीएफ-९५ निवृत्त कर्मचारी संघटनेचा मोर्चा ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे विरोधी पक्षात असतांना राज्यसभेत मांडलेल्या सुचना क्रमांक १४७ नुसार तत्कालीन सरकारने भगतसिंग कोशियारी समिती नेमली होती. या समितीने ३ सप्टेंबर २०१३ रोजी आपला अहवाल सादर केला त्या समितीत जावडेकरही एक सदस्य म्हणून कार्यरत होते. कोशियारी समितीची प्रमुख शिफारस देशभरातील निवृत्तांना किमान ३ हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता द्यावा ही होती. सरकारने या शिफारशी त्वरीत स्विकाराव्या अशी जोरदार मागणी त्यावेळी जावडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. २०१४ च्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी व खुद्द प्रकाश जावडेकरांनी आम्ही सत्तेवर आल्यास कोशियारी समितीच्या अहवालाची त्वरीत अंमलबजावणी करु असे आश्वासन दिले होते.मात्र भाजपा सरकारने आजपर्यंत टाळाटाळ करण्या पलीकडे काही केले नसल्याचे संघटनेचे म्हणणे केली. खासदार दिलीप गांधी यांना श्रममंत्री संतोष गंगवार यांनी संघटनेच्या मागण्या संदर्भात कोशियारी समितीच्या बाबी लागू करण्याच्या मागणीला आर्थिक बाब समोर आणीत असमर्थता दर्शविली. ही देशभरातील ईपीएफ-९५ निवृत्त कर्मचाºयांची शुद्ध फसवणूक असल्याचे त्यांनी सांगितले.या फसवेगिरी विरोधातील भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी व ‘कोशियारी समतिीची अंमलबजावणी नाही तर मते नाहीत’ हा संदेश देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील ईपीएफ-९५ पेन्शनधारकांचा धडक मोर्चा ५ जुलैला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले.