शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

मुरबाडमध्ये जनावरे फाडणारा करतो शवविच्छेदन

By admin | Published: January 05, 2017 5:25 AM

मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालय तसेच ट्रामा केअर सेंटरमध्ये रु पांतर झाले असले तरी येथे योग्य सुविधा तसेच मनुष्यबळ नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते

प्रकाश जाधव, मुरबाडमुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालय तसेच ट्रामा केअर सेंटरमध्ये रु पांतर झाले असले तरी येथे योग्य सुविधा तसेच मनुष्यबळ नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. परिणामी, आरोग्य व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. शवविच्छेदन करणारा कर्मचारी नसल्याने पशुसंवर्धन विभागात जनावरांची चिरफाड करणारा कर्मचारीच शवविच्छेदानाचे काम करतो, असे धक्कादायक वास्तव उघड झाले.मुरबाड तालुक्यात सुमारे सात प्राथमिक आरोग्य केंद्रे असली तरी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रे ही अनेक वर्षांपासून बंद आहेत. ती सुरु करण्यास जि.प.आरोग्य प्रशासन हे सपशेल अपयशी ठरले आहे. विशेष म्हणजे, ही आरोग्य केंद्रे देखील शनिवार-रविवार बंदच असतात. त्म्हसा आरोग्य केंद्राला सर्वाधिक औषधांचा पुरवठा होत असताना येथील औषध साठा नेहमीच गायब होतो. रु ग्णांना इंजेक्शन देण्यासाठी लागणाऱ्या सुयादेखील आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याने बाजारातून त्या आणण्यासाठी रुग्णांना वणवण भटकावे लागते. एखाद्या वेळेस डॉक्टर नसतील तर त्याचाही भार मुरबाड ग्रामिण रु ग्णालयावर असतो. मात्र, सुटीच्या दिवशी तेथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचारासाठी रुग्णांना थेट खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागतो.विकी यादव या आठ वर्षांच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा पुरेशी सक्षम नसल्यानेच ही दुर्घटना झाली. सर्पदंशानंतर त्याला थेट मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे आॅक्सिजनची सुविधा नसल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला थेट उल्हासनगरला पाठविले. तेथेही त्याला उपचार न मिळाल्याने १०८ या रुग्णवाहिकेने जे. जे. रुग्णालयात पाठवले. तेथेही उपचार न झाल्याने तेथून सायन आणि पुन्हा ठाणे सिव्हिल असा प्रवास मरणासन्न विकीला करावा लागला. यातील कोणत्याही ठिकाणी त्याच्यावर उपचार झाले नाहीत. अखेर त्याच्या पालकांनी ठाण्यातीलच खाजगी वेदांत हॉस्पिटल गाठले. मात्र, तेथे पोहोचेपर्यंत उशीर झाल्याने विकीचा मृत्यू झाला. मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दररोज जवळपास चारशेच्या आसपास रुग्ण येतात. तरीही आरोग्य प्रशासनाने तेथे बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे किरकोळ आजार, प्रसुतीसाठी उल्हासनगर किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागते. रुग्णांना औषधे देण्यासाठी तीन औषध निर्माण अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, एकावरच जबाबदारी असल्याने त्यांच्या गैर हजेरीत शिपायाला ती भूमिका बजवावी लागते. परिचारिकांची बारा पदे मंजूर असुन केवळ आठ कर्मचारीच तेथे आहेत. प्रयोग शाळा तंत्रज्ञ तीन पैकी एक, लिपिक तीन आहेत. तरीही केस पेपरसाठी लिपिकाची गरज असताना रु ग्ण वाहिकेचे चालक किंवा सुरक्षा रक्षक केस पेपर देत असतात.या बाबत मुंबई आरोग्य विभागाच्या सह संचालक रावखंडे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.