शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

कबुतरांच्या पाठीशी अ‍ॅनिमल वेल्फेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 2:18 AM

आयुक्तांना दिले पत्र : शहरवासीयांमध्ये गंभीर आजार पसरत असल्याने मनपा गंभीर

वसई : कबुतरांपासून होणाऱ्या आजारांमुळे वसई-विरारकर अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. श्वसनविकारासोबत इतरही आजार बळावत असल्यामुळे महापालिकेने शहरात सार्वजनीक ठिकाणी कबूतरांना खाणे टाकू नये अन्यथा दंड आकारण्यात येईल म्हणून बॅनर लावले आहेत. दरम्यान, कबुतरांपासून कोणताही आजार फैलावत नसल्याचे पुरावे सादर करत अ‍ॅनिमल वेल्फेअर कार्यकर्त्यांनी आयुक्तांना निवेदन देऊन आपण कबुतरांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले आहे.

कबुतरांना खायला घालणे, पाणी देण्याच्या सवयींमुळे नागरिक त्यांच्या संपर्कात येतात. कबुतरांच्या शरीरावरील मांस व कीटकांमुळे फुफ्फुसाला अ‍ॅलर्जी होते. त्यातुन फुफ्फुसाला सूज येते. हा आजार लवकर लक्षात येत नाही. तो जुनाट झाल्यास मृत्यू होण्याचा धोका असतो. फुफ्फुसांशी संबंधित आजार झालेल्यांमध्ये ‘हायपर सेंसेटिव्ह न्यूमोनिया’ होण्याचे आजाराचे सर्वांधिक ६० ते ६५ टक्के प्रमाण आहे. यासाठी वसई विरार महानगरपालिकेने शहरात सार्वजनीक ठिकाणी कबूतरांना खाद्यपदार्थ टाकू नये म्हणून जनजागृतीसाठी बॅनर लावले आहेत. यात जर कोणी उघड्यावर कबूतरांना खाद्यपदार्थ देताना आढळल्यास ५०० रूपये दंड आकारण्यास सुरूवात केली आहे.याबबत अ‍ॅनिमलवेल्फेअर संघटनेचे मितेश जैन यांनी दिल्ली व एडब्ल्यूबीआयचे सदस्य गिरीश शाह यांच्याशी पत्रव्यवहार करून याबाबत कळवले होते. त्यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एबीबीआय मंडळाचे सचिव डॉ. नीलम बालाजी यांच्या समोर मांडला होता. त्यानंतर वसई विरार महानगरपालिका आयुक्तांना २ एप्रिल रोजी पत्र पाठवले होते. त्याचप्रमाणे जैन यांना जे कबूतरांना देत असलेल्या आहाराबाबतच्या नोटीसचे स्पष्टीकरण व अहवाल मागितला होता. त्यांनी त्याची एक प्रत आयुक्तांना दिली आहे.

आयुक्तांनी जैन यांना अधिसूचना रद्द करणार असल्याचे सांगीतले. त्यामूळे आता शहरात कबुतरांना सार्वजनीक ठिकाणी खाणे टाकण्यास बंदी असलेले बॅनर काढण्यात येणार आहेत. मात्र याबाबत पालिका आयुक्त बळीराम पवार यांनी,आंम्हाला याबाबत निवेदन आले असल्याचे सांगीतले असून, चौकशी नंतरच योग्य ते आदेश देण्यात येतील असे सांगीतले.गेल्या काही वर्षात शहरामध्ये दम्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. नाक कोंदणे, श्वास घेताना त्रास होणे, दम-धाप लागण्यासह, खोकला न थांबण्याचं प्रमाणही सर्रास आढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

५०० रु पये दंडमुंबई महानगरपालिके पाठोपाठ कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ घालणाऱ्यांना आता पाचशे रु पयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतला असून कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाºया जंतूंमुळे हायपरसेस्नेटीव्ह निमोनिया हा आजार होतो. तो फुफुसांशी संबंधित असून तो मुंबई -पुण्यात मोठ्याप्रमाणात आढळून आला आहे.