शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

बॉम्बस्फोटाचे निनावी पत्र... अन एकच गोंधळ

By admin | Published: November 07, 2015 12:20 AM

पालघर-माहीम रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेसमोर भरणाऱ्या शुक्रवारच्या बाजारात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या निनावी पत्रामुळे सगळी यंत्रणा कामाला लागली

पालघर : पालघर-माहीम रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेसमोर भरणाऱ्या शुक्रवारच्या बाजारात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या निनावी पत्रामुळे सगळी यंत्रणा कामाला लागली आणि सरतेशेवटी ही धमकी खोटी असल्याचे तपासात उघड झाल्यानंतरच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हे पत्र आले आणि बॉम्बशोधक पथक, दहशतवादविरोधी पथकाने बँकेसमोरील सर्व भाग सकाळपासून ताब्यात घेत तपासणी केली. या वेळी दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या हजारो ग्राहकांची पूर्ण काळजी घेत ही मोहीम यशस्वीपणे राबविली. पालघर तालुक्यातील सर्वात मोठा आठवडाबाजार म्हणून पालघरचा आठवडाबाजार ओळखला जातो. कपडे, मसाले, धान्य, मासे इ. बहुतांशी जीवनावश्यक वस्तू या बाजारपेठेत मिळत असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी येत असतात. तसेच औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनाही सुटी असल्यानेही दिवाळीच्या खरेदीसाठी कामगारवर्गाची मोठी गर्दी असते. या गर्दीमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी सलीम सुलेमाननामक व्यक्तीने पालघर जिल्हा अधीक्षक कार्यालयात निनावी पत्र लिहून शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास या आठवडाबाजारातील क्रॉकरीची विक्री करणाऱ्या दुकानाजवळ बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचे कळविले होते. या अनुषंगाने सकाळी ८ वा. ठाणे बॉम्बशोधक पथक, दहशतवादविरोधी पथक, पालघर पोलिसांनी पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक भगवान यशोद, जयंत बजबळे यांच्या सूचनेनुसार बँकेसमोरील सर्व विक्रेत्यांच्या दुकानांचा ताबा घेतला. बॉम्बशोधक पथकातील ‘बिजली’ या कुत्रीने संशयित सर्व भाग हुंगून काढल्यानंतर कुठेही बॉम्ब नसल्याचे दर्शविल्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी एस.एन. यमगर यांनी लोकमतला सांगितले. त्यानंतर ११ वा. पुन्हा बाजार पूर्ववत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. निनावी पत्रामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला असला तरी क्रॉकरी विक्रेत्या दुकानदारांच्या वैमनस्यातून हा निनावी पत्राचा खटाटोप केला तर नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)