नालासोपारा - विरारच्या मंदार रिअॅल्टर्स या बिल्डरने प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना ३८ लाखांचा गंडा घातला आहे. त्यांनी या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या गुन्हे दाखल केलेले ७ संचालक फरार झाले आहेत. संचालक राजू सुलीरे, अविनाश ढोले आणि त्यांच्या अन्य ५ साथीदारांनी विरारच्या नारिंगी येथे मंदार एव्हेन्यू एफ १ नावाचा गृहप्रकल्प विकसित करणार असल्याचे भासविले होते. त्यात आधुनिक सुखसोयींनी युक्त अशी घरे माफक दरात देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ग्राहकांना वेळेत सदनिका, वाणिज्य गाळ्यांचा ताबा दिला नाही.एकाच सदनिकेच्या विक्रीचे अॅग्रीमेंट बोगस दस्तऐवजांच्या आधारे अनेकांच्या नावे करून फसवणूक केली होती. या प्रकरणी फेमिदा नसीम अहमद या महिलेच्या तक्रारीवरून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या विविध कलमांसह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.सोमवारी दिली तक्रारपौडवाल यांनी या प्रकल्पात २०१३ मध्ये दोन सदनिकांची नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी ३८ लाख रुपये भरले होते. मात्र, त्यांचीही फसवणूक करण्यात आली. त्यामुळे सोमवारी त्यांनी तक्रार दाखल केली. त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ ग्राहकांनी तक्र ार केली आहे.
अनुराधा पौडवाल यांना ३८ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 6:35 AM