शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
4
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
5
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
6
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
7
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
8
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
9
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
10
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
11
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
12
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
13
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
14
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
16
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
17
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
18
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
19
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
20
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला

खोलसापाडा -१ धरणासाठी ३४८ एकर वनजमीन देण्यास मंजुरी; वसई-विरारकरांना दिलासा

By नारायण जाधव | Published: August 22, 2022 4:11 PM

केंद्राने हिरवा कंदील दिल्याने राज्य शासनाचा निर्णय : वसई-विरार महापालिकेला मिळणार ७०एमएलडी पाणी

नारायण जाधवनवी मुंबई : वसई विरार शहराची लोकसंख्या आजघडीला २२ लाखांच्या घरात असून, या लोकसंख्येला ३५० एमएलडी इतक्या पाण्याची गरज आहे. मात्र, सद्यःस्थितीत शहराला २३० एमएलडी इतकाच पाणीपुरवठा होत आहे. शहराला सूर्या धरणातून १८५, उसगाव धरणातून २०, पेल्हार धरणातून १४ आणि फुलपाडा पाणी योजनेतून दीड एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय महापालिकेला खोलसापाडा-१ व खोलसापाडा-२ धरण योजनेतून ७० एमएलडी पाण्याची प्रतीक्षा आहे. याच खोलसापाडाच्या टप्पा १ साठीसाठी आवश्यक असलेल्या १३९.४७३ हेक्टर अर्थात ३४८.६८ एकर वनजमीन देण्यास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्याने राज्याच्या वन विभागानेही सोमवारी ती वळती करण्यास अंतिम मंजुरी दिली. यामुळे वसई-विरार महापालिकेच्या धरणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

हे धरण पूर्ण झाल्यानंतर मुंबई व नवी मुंबई महापालिकेनंतर स्वतःच्या मालकीचे धरण असलेली वसई-विरार दुसरी, तर पालघर जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. भविष्यात एमएमआरडीएच्या विकास आराखड्यानुसार वसई-विरारची लोकसंख्या पुढील २० वर्षांत ४५ लाख होणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी महापालिकेने विविध योजनांवर काम सुरू केले आहे. यात खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ चे काम प्रस्तावित केले आहे. यासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी २३१ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे. खोलसापाडा टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ या स्वतंत्र योजना आहेत. त्यातून ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. 

३९.६७२ हेक्टर संरक्षित वनाचा समावेशसोमवारी जी १३९.४७३ हेक्टर वनजमीन वळती करण्यास मंजुरी दिली आहे, त्या राखीव वन ९९.८०१ हेक्टर, तर वूडलँड संरक्षित वन जमीन ३९.६७२ हेक्टर आहे. भारत सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अटी व शर्तीनुसार या वनांवर धरण उभारावयाचे आहे. यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होणार असून, सात गावच्या हद्दीतील अनेक आदिवासी पाडेही बाधित होणार आहेत.

* या गावांतील जमीन जाणार*गावाचे नाव- राखीव वन- संरक्षित वनकंरजोन-९७.४६१ हेक्टर- ७.४० हेक्टरतिल्हेर - ०००- ८.५७७ हेक्टरदीपिवली-०००- ३.८२५हेक्टरपारोळ- २.३४० हेक्टर-४.५९१ हेक्टरउसगाव- ०००-९.३८३ हेक्टरशिवनसाई-०००-४.५२३ हेक्टरचांदीप-०००-१.३७३ हेक्टरएकूण-९९.८०१ हेक्टर - ३९.६७२ हेक्टर