शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

‘त्या’ खलाशांच्या प्रतिकृतींवर अंत्यसंस्कार , ओखा बंदरातील दुर्घटना, बोटीच्या अवशेषातून सापडला राजेशचा मृतदेह  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 5:32 AM

गुजरातच्या ओखा बंदरातील खोडीयाल माता या मच्छीमार बोटीला आॅगस्ट अखेरीस जलसमाधी मिळाली होती. बोटीतील दहापैकी पाच खलाशी वाचले मात्र उर्विरत खलाशांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यापैकी राजेश परशु ठाकरे याचा मृतदेह पंधरादिवसानी हाती लागला आहे.

डहाणू/बोर्डी : गुजरातच्या ओखा बंदरातील खोडीयाल माता या मच्छीमार बोटीला आॅगस्ट अखेरीस जलसमाधी मिळाली होती. बोटीतील दहापैकी पाच खलाशी वाचले मात्र उर्विरत खलाशांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यापैकी राजेश परशु ठाकरे याचा मृतदेह पंधरादिवसानी हाती लागला आहे. तर अन्य दोन खलाशाच्या कुटुंबीयांनी बेपत्ता खलाशांच्या प्रतिकृती बनवून अंत्यसंस्कार आटोपले.या मासेमारी बोटीतील खलाशी बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या डहाणूतील कुटुंबीयांनी ओखा बंदरात जाऊन बोटमालकांकडे चौकशी केली. मात्र त्यात सुरक्षायंत्रणांनाही अपयश आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबीय निराश होऊन माघारी परतले होते. लोकमतने या बद्दल बातमी प्रसिद्ध केल्यानंतर डहाणूतील महसूल विभागाने पीडितांच्या घरी जाऊन पंचनाम्याद्वारे शासकीय दफ्तरात नोंदही केली. त्यानंतर नरपड व चिखले गावच्या दोन पीडित कुटुंबीयांनी बेपत्ता घरधान्याच्या परतीच्या आशा मावळल्याने त्यांची प्रतिकृती करून अंत्यसंस्कार पार पाडले.दरम्यान जलसमाधी मिळालेल्या बोटींचे अवशेष समुद्रातून काढताना चिखले गावातील राजेश परसु ठाकरे या खलशाचा मृतदेह हाती लागला आहे. त्यामुळे अन्य चार खलाशांच्या मृतदेहाची शोधमोहीम तटरक्षक दल व गुजरात बंदर विभाग यांच्याकडून सुरु करण्यात आल्याचे वृत्त आहे.दरम्यान, पालघर विधानसभेचे आमदार अमीत घोडा, यांनी मृतखलाशी राजेश ठाकरे यांच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी शिवसेनेचे डहाणू तालुका प्रमुख संतोष वझे, शहर प्रमुख संजय कांबळे आदि उपस्थित होते.