शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

वसई अन् जव्हारमध्ये मात्र सेना-भाजप ‘युती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:24 AM

संडे अँकर । वसईत शिवसेनेचा सभापती, भाजपचा उपसभापती; बहुजन विकास आघाडीला ठेवले सत्तेपासून दूर

पारोळ : राज्यात शिवसेना-भाजप एकत्र आले नसले तरी वसई पंचायत समितीत मात्र बहुजन विकास आघाडीला दूर ठेवण्यासाठी ‘युती’ची सत्ता स्थापन झाली आहे. शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनुजा अजय पाटील सभापती, तर भाजपच्या वनिता तांडेल यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. दरम्यान, शिवसेना व भाजप यांची राज्यात युती तुटली असली तरी वसईत आणि जव्हारमध्ये ‘युती’ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

७ जानेवारी रोजी पार पडलेल्या वसई पंचायत समिती निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात वसई तालुक्यातील ८ गणांपैकी ३ गणांत बहुजन विकास आघाडीला, ३ गणांत शिवसेनेला आणि २ गणांत भाजपला विजय मिळाला होता. सत्तास्थापनेसाठी ५ हा आकडा महत्त्वाचा असल्याने बविआ आणि शिवसेनेला साहजिकच भाजपच्या दोन विजयी उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार होते.महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांची युती न होता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्याने वसई पंचायत समितीत सत्तेसाठी युती होणार नाही, असे राजकीय जाणकारांनी वर्तवले असतानाच शिवसेना-भाजप यांची वसई पंचायत समितीत युती झाल्याने सर्व राजकीय गणिते बदलली आहेत.वसई पंचायत समितीच्या बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांना सत्तेसाठी समान संधी होती. पण त्यासाठी भाजपची साथ आवश्यक होती. यामुळे भाजप कोणासोबत जाते याकडे वसईकरांचे लक्ष लागले होते. सभापतीसाठी आरक्षण हे ओबीसी महिला असे पडले होते. त्यामुळे बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांच्याकडे ओबीसी महिला होत्या, पण सभापती निवडणुकीत भाजपने उपसभापतीपद घेत आपले समर्थन सेनेला दिल्याने तिल्हेर गणातून सेनेतून निवडून आलेल्या अनुजा पाटील यांना सभापतीपदाचा मान मिळाला. वसई पंचायत समितीवर सभापती व उपसभापती महिला झाल्याने समितीवर महिलाराज आले आहे.लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : राज्यात शिवसेना-भाजप एकत्र आले नसले तरी वसई पंचायत समितीत मात्र बहुजन विकास आघाडीला दूर ठेवण्यासाठी ‘युती’ची सत्ता स्थापन झाली आहे. शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनुजा अजय पाटील सभापती, तर भाजपच्या वनिता तांडेल यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. दरम्यान, शिवसेना व भाजप यांची राज्यात युती तुटली असली तरी वसईत आणि जव्हारमध्ये ‘युती’ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.७ जानेवारी रोजी पार पडलेल्या वसई पंचायत समिती निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात वसई तालुक्यातील ८ गणांपैकी ३ गणांत बहुजन विकास आघाडीला, ३ गणांत शिवसेनेला आणि २ गणांत भाजपला विजय मिळाला होता. सत्तास्थापनेसाठी ५ हा आकडा महत्त्वाचा असल्याने बविआ आणि शिवसेनेला साहजिकच भाजपच्या दोन विजयी उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार होते.महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांची युती न होता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्याने वसई पंचायत समितीत सत्तेसाठी युती होणार नाही, असे राजकीय जाणकारांनी वर्तवले असतानाच शिवसेना-भाजप यांची वसई पंचायत समितीत युती झाल्याने सर्व राजकीय गणिते बदलली आहेत.वसई पंचायत समितीच्या बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांना सत्तेसाठी समान संधी होती. पण त्यासाठी भाजपची साथ आवश्यक होती. यामुळे भाजप कोणासोबत जाते याकडे वसईकरांचे लक्ष लागले होते. सभापतीसाठी आरक्षण हे ओबीसी महिला असे पडले होते. त्यामुळे बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांच्याकडे ओबीसी महिला होत्या, पण सभापती निवडणुकीत भाजपने उपसभापतीपद घेत आपले समर्थन सेनेला दिल्याने तिल्हेर गणातून सेनेतून निवडून आलेल्या अनुजा पाटील यांना सभापतीपदाचा मान मिळाला. वसई पंचायत समितीवर सभापती व उपसभापती महिला झाल्याने समितीवर महिलाराज आले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारShiv Senaशिवसेना