वसई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. गुरुवारी संध्याकाळी एका नऊ वर्षाच्या मुलीला जखमी केलेल्या भटक्या कुत्र्यांनी वर्षभरात दहाहून अधिक जणांवर हल्ला करून जखमी केले आहे. सध्या किनाºयावर दोनशेहून अधिक भटकी कुत्री झुंडीने फिरत असून त्यात अ़नेक पिसाळलेल्या कुत्र्यांचा समावेश आहे. या कुत्र्यांचा त्रास गावकºयांसह पर्यटकांनाही होऊ लागला आहे.अ़र्नाळा गावातील अपूर्वा महादेव तांडेल (९) ही मुलगी गुरुवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसह समु्द्रकिनारी खेळत असताना पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी मुलांवर हल्ला केला. यावेळी अपूर्वा झुंडीच्या तावडीत सापडली. पिसाळलेल्या कुत्र्यांनी तिला अ़नेक ठिकाणी चावा घेऊन जखमी केले. गावकºयांनी कुत्र्यांना हाकलून अपूर्वाची सुटका केली.कुत्र्यांच्या तावडीत सापडलेली अपूर्वा ही पहिली मुलगी नाही. याआधी या कुत्र्यांनी समुद्रकिनाºयावर आलेल्या किमान दहाहून अधिक जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादाने मॉर्निंग वॉक करणाºयांची संख्या आता कमी झाली आहे. एकटा दुकटा दिसला की कुत्र्यांची झुंड त्यांच्यावर हल्ला करताना दिसते. पर्यटकांनाही या भटक्या कुत्र्यांना त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या दोन वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रासाचा सामना गावकºयांना करावा लागत आहे. वसई विरार महापालिकेचे कर्मचारी शहरातील भटकी कुत्री पकडून निर्बिजीकरण केल्यानंतर त्या कुत्र्यांना समुद्रकिनारी आणून सोडत असतात. सहा महिन्यांपूर्वी कुत्री घेऊन आलेल्या महापालिकेच्या गाडीला गावकºयांना पिटाळून लावले होते.आता रात्री अपरात्री कुत्री आणून सोडली जात आहेत. कुत्र्यांना खायला मिळत नसल्याने डंम्पिंग ग्राऊंडवर त्यांनी ठाण मांडले आहे. तर भुकलेली कुत्री समुद्रकिनारी असलेल्या स्मशानात प्रेत जळत असताना खेचून नेत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अनेकदा झुंडीने पळवून नेलेली प्रेते पुन्हा अग्नीत टाकण्याचे काम गावकºयांना करावे लागले आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या भितीने आता गावकºयांना प्रेत पूर्ण जळेपर्यंत स्मशानात ठाण मांडून राखण करीत बसावे लागत आहे.>महाालिकेचे कर्मचारी भटकी कुत्री सोडत असल्याची तक्रार गावकºयांकडून आल्यानंतर ग्रामपंचायतीने महापालिकेकडे तक्रार केलेली आहे. भटक्या कुत्र्यांमध्ये अ़नेक पिसाळलेली कुत्री आहेत. महापालिकेने त्याचा बंदोबस्त करायला हवा.-सतीश तांडेल, उपसरपंच, अर्नाळा ग्रामपंचायत
अर्नाळा समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांचा हैदोस, वर्षभरात १० जणांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 3:15 AM