वसई : अर्नाळा सागरी पोलिसांनी पावसाळ््यात खबरदारी म्हणून समुद्रात उतरण्यास पर्यटकांवर घातलेली बंदी निरर्थक ठरली आहे. टेहळणी मनोºयावर पोलीस नाहीत, गस्त नाही यामुळे पर्यटक खुलेआम समुद्रात उतरून प्रसंगी जीवघेणी ठरणारी मौजमजा करतांना दिसत आहेत.पावसाळ््यात समुद्र खबळलेला असतो. लाटांच्या तडाख्याने अ़र्नाळा किनारा वाहून गेला आहे. इतकेच नाही तर सुरुच्या बागेतील अ़नेक झाडेही उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अर्नाळा सागरी पोलिसांनी पावसाळ््यात पर्यटकांना समुद्रात उतरण्यास बंदी घातली आहे. ती अमलात आणण्यासाठी पोलीस गस्त घालतील असेही सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र अर्नाळा समुद्र किनाºयावर एकही पोलीस गस्त घालताना दिसत नाही. मनोºयावर टेहळणीसाठी एकही पोलीस तैनात करण्यात आलेला नाही.सध्या शनिवार, रविवारसह सुट्टीच्या दिवशी अर्नाळा किनाºयावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. भरतीच्या वेळी उसळणाºया लाटांबरोबर मौजमजा करण्यासाठी पर्यटक समुद्रात उतरत आहेत. त्यांना अटकाव करताना कुणीही दिसत नाही.
अर्नाळाकिनारी पोलीस गस्तच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:27 PM