पालघर/ विरार : तुळींज येथील पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करून ६ लाख रुपयांची खंडणी मागणाºया आरोपीना अटक करून सचिनची सुखरूप सुटका करण्यात आली. सातपाटी सागरी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सातपाटीमधील दोन तरुणासह एकूण तीन आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा मास्टरमाइंड मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.वसई तालुक्यातील तुळींज पोलीस स्टेशन अंतर्गत नारिया नगर, जय अंबे चाळीत राहणाºया एका रिक्षा चालकाच्या सहा वर्षिय मुलाचे अपहरण गुरुवारी करण्यात आले होते. त्याचा शोध घेऊनही तो कुठेही सापडला नाही. त्या दिवशी संध्याकाळी तुझा मुलगा आमच्या ताब्यात असून तो सुखरूप हवा असल्यास ६ लाखाच्या खंडणीचा फोन रिक्षाचालकाला आला.रिक्षाचालकाला एवढी खंडणी देणे शक्य नसल्याने त्या मुलाच्या आईने तुळींज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी किशोर खैरनार यांना सर्व हकीकत सांगितली. फिर्याद नोंदवून त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अपहरत मुलाच्या वडिलांच्या मोबाईलवर आलेल्या नंबर वरून तात्काळ अपहरणकर्त्याच्या मोबाईलच्या लोकेशनच्या दिशेने तपासाची चक्रे फिरू लागली. सातपाटी सागरी पोलीस स्टेशन व परिसराच्या भागातून हा मेसेज आल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी व्हनमाने व त्यांच्या टीम ने या प्रकरणाची सूत्रे हाती घेऊन सातपाटी गाठले.सातपाटी सागरी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या टीम सोबत, तुळींज पोलिसांची टीम ई नी संयुक्तरित्या गुरु वारी रात्री सातपाटी, पालघरच्या प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी लावली. येणाºया, जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरु झाल्याने मुलाला बरोबर नेणे धोकादायक असल्याचे लक्षात येताच आरोपींनी अपहरणकर्त्या मुलाला पालघर-माहीम रस्त्यावर सोडून दिले.त्या रस्त्यावरून जाणाºया एका मोटारसायकलस्वाराने त्याला रडताना पहिले व माहीम चौकीत आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या मुलाची ओळख पटल्यानंतर आरोपींनी नाकाबंदीमध्ये आपण पकडले जाऊ या भीतीने मुलाला सोडले असल्याचा तर्क पोलिसांनी लढवून आरोपींचा शोध सुरु केला.वरील आरोपी बोईसरला जाण्याच्या तयारीत असतांना पालघर भागातून मोटारसायकवर जाताना त्याच्यावर झडप घालून सातपाटी येथील तुफान पाड्यातील बेकायदेशीर झोपडपट्यात राहणाºया मुकेशविनोद राजपूत व भावेश मिलन भोईर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पालघरच्या आंबेडकरनगरमध्ये राहणाºया मुकेश रोहिदास सकट या अन्य आरोपीलाही पोलिसांनी घरातून जेरबंद केले. या प्रकरणातील मास्टर मार्इंडची ओळख पटली असून त्याचा शोध पोलिसांनी घेत आहेत.या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपीना अटक केली असून लवकरच या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील असा विश्वास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी व्हानमाने यांनी व्यक्त केला.
मुलाचे अपहरण करून ६ लाख रुपयांची खंडणी मागणा-या आरोपींना अटक, मुलाची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 4:02 AM