बोईसर : महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्यूकेशन एक्याडमी (तारापुर) व डॉ. स. दा .वर्तक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बोईसर कला क्र ीडा महोत्सवाची शानदार सुरु वात गुरु वारी (दि. २६) झाली असून या स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे वीस हजार खेळाडू सहभागी घेतला आहे. या महोत्सवाचे हे १२ वे वर्ष आहे. बोईसर येथील पारसी ट्रस्ट मैदानावर दि. २६ ते ३० जानेवारी पर्यंत आयोजित केलेल्या या क्रिडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन पालघर जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या हस्ते करण्यांत आले. या वेळी महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्यूकेशन ऐकेडमीचे अध्यक्ष संजय ज. पाटील, शास्त्रीय संगीतात मुंबई विद्यापीठातून प्रथम आलेले स्वप्नील चाफेकर, डॉ नंदकुमार वर्तक, कृषी सभापती अशोक वडे, सरपंच वैशाली बाबर, प.स. सदस्य वीणा देशमुख, उपसरपंच राजू करवीर, जे.एस. डब्ल्यू. स्टीलचे बबन जाधव, पीएसआय संदीप पोमण, कार्याध्यक्ष डेरल डिमेलो, जेष्ठ पत्रकार अशोक चुरी, श्रमजीवीचे तेजस पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्र मात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आणि मानाचा पुरस्कार मिळालेले प्रमोद पाटील, सुलोचना पाटील, साक्षी पाटील, रोहिणी गिरासे, ममता पटेल आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यांत आला. कार्यक्र माचे सूत्र संचलन प्रा. संजय घरत यांनी केले.(वार्ताहर)
कला-क्रीडा महोत्सव सुरू!
By admin | Published: January 28, 2017 2:21 AM