शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

कृत्रिम तलावांची योजना यंदाही बारगळण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:57 PM

पालिकेची उदासीनता । भाविकांमध्ये जनजागृती करण्याबाबत प्रशासनाला अपयश

आशिष राणे।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याचा पालिकेचा प्रयत्न दुसऱ्या वर्षीही फसताना दिसत आहे. एकूणच पालिका हद्दीतील नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने यावर्षीही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची योजना बारगळल्यातच जमा आहे.अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. मात्र पालिकेने कुठेही विसर्जनाची सोय म्हणून कृत्रिम तलावांची सोयच केली नसल्याची माहिती शहर अभियंता माधव जवादे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे यंदाही तलावात आणि समुद्रात पारंपरिक पद्धतीनेच गणेश विसर्जन होणार आहे हे स्पष्ट आहे.दरम्यान, कृत्रिम तलाव ही संकल्पनाच मागीलवर्षी व यंदाही बारगळत किंवा रद्द झाल्याने तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी भाविकांनी छोट्या मूर्ती बसवाव्यात, असे आवाहन नेहमीच पालिका प्रशासन व महापौर करत असतात. मात्र पालिका प्रशासन याच कृत्रिम तलावांबाबत आग्रही का नाही हे मात्र कोडे आहे.पालिकेची उदासीनता !‘हरित वसई, स्वच्छ वसई’ असा नारा देणाºया वसई-विरार महापालिकेला यंदाही पर्यावरणच्या संवर्धनासाठी शहरात कृत्रिम तलाव उभारता आलेले नाहीत ही शोकांतिका आहे. पालिका व नागरिकांची ही उदासीनता असून कृत्रिम तलावांबाबत जनजागृती करण्यात आलेल्या अपयशामुळे यंदाही पालिकेने कृत्रिम तलाव न उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.आयुक्त, महापौरांनी निर्णय घेण्याची गरज?गेल्यावर्षी तत्कालीन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी कृत्रिम तलाव बनवण्याचा संकल्प जाहीर केला होता. प्रत्येक प्रभागात कुठे कृत्रिम तलाव उभारले जातील, त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. परंतु त्या वेळी नागरिकांची मानसिकता तयार झालेली नव्हती. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर करा, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यासाठी वेळ कमी पडेल, असे लक्षात आल्यानंतर तेव्हाही योजना बारगळली होती. आताही ती राबवली जाईल का याबाबत शंका उपस्थित होत आहे.गेल्यावर्षीचा धडा घेऊन पुढे चूक सुधारू, असे म्हणत यंदाचा गणेशोत्सव येवून ठेपला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी व्यवस्थित तयारी करून, नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम तलाव उभारले जातील, असे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. मात्र यंदाही मागचा कित्ता गिरवण्यात आला आहे. कृत्रिम तलावांचे महत्त्व भाविकांना पटवून देण्यात पालिका पुन्हा अपयशी ठरली आहे.पर्यावरणप्रेमींची नाराजीपर्यावरणाबाबत सजग असणाºया भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून पालिकेकडे तब्बल एक वर्षांचा कालावधी होता. मग कृत्रिम तलावाबाबत योग्य नियोजन आणि जनजागृती का बरे केले नाही, असे वसईतील पर्यावरणप्रेमी नागरिक यांनी प्रश्न विचारला आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या तलावांच्या सुशोभीकरणासाठी पालिका लाखो रुपये खर्च करते आणि आम्हाला नाईलाजाने त्यातच विसर्जन करावे लागते. कृत्रिम तलाव असते तर तलावांचे प्रदूषण थांबले असते, अशी संतप्त प्रतिक्रि या आता पर्यावरणप्रेमी देत आहेत.उत्सवाच्या बैठका नावालापालिका आयुक्त आणि महापौरांनी गणेशोत्सव मंडळाच्या पूर्वतयारीसाठी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेतल्या होत्या. परंतु अनेक नगरसेवकांनी त्याला नकार दिल्याचे समजते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनीही कृत्रिम तलावाला विरोध केला. त्यामुळे कृत्रिम तलावाची योजना यंदाही दुसºयावर्षीही बारगळली आहे.