लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : दिवाळी आली की सर्व कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो असे असताना समाजातील गरीब वस्तीत खऱ्या अर्थाने आरोग्य जनजागृती करणाऱ्या भिवंडी पालिका क्षेत्रातील तब्बल १४२ आशा स्वयंसेविका त्या पासून वंचित असल्याने महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सरचिटणीस भगवान दवणे यांच्या नेतृत्वाखाली आशा स्वयंसेविकांनी भिवंडी येथील पदाधिकारी अर्चना थोरात,प्रचिती शेळके,दीपा गुप्ता,आफ्रिन अन्सारी,रत्ना गुगलवार,आरती नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका मुख्यालया समोर शुक्रवारी ओवाळणी करीत आंदोलन केले आहे .
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात १४२ आशा स्वयंसेविका कार्यरत असून तुटपुंज्या ३ ते ५ हजार रुपये मानधना वर त्या काम करीत आहेत. शासन अंगणवाडी सेविकांना ही दोन हजार रुपये भाऊबीज भेट देते .परंतु आशा स्वयंसेविका या गोरगरीब वस्तीत आरोग्य जनजागृती करण्यात अग्रेसर असून,केंद्र व राज्य शासना कडील आरोग्य विषयक कार्यक्रम राबवतात. त्यांना ही बोनस देणे अत्यावश्यक असून ते मिळावी अशी आमच्या भगिनींची मागणी असल्याची माहिती भगवान दवणे यांनी दिली आहे .