पालघर - ४२ मूळचे तारापूर येथील रहिवासी असलेल्या स्वर्गीय काशिनाथ कृष्णजी राऊत यांनी सुमारे ४२ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘श्री पंढरपूर वारी’चा वारसा पुढे त्यांचे पुत्र अॅड. शरद राऊत व कुटुंबीय, नातेवाईक व मित्र परिवाराकडून आजही सुरू आहे. पालघर जिल्ह्यातून असंख्य वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असतात. मात्र त्यांच्या मंडळांची एकत्रित अशी नोंद झालेली आढळत नाही. प्रत्येक तालुक्यातून गटागटाने किंवा स्वतंत्रपणे लोक वारीला जातात, अशी माहिती अनेक वारकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.डोळे भरून दर्शन घेता येणार नाहीबोईसर : मागील अनेक वर्षांपासून मी नियमित पंढरपूरवारीमध्ये सहभागी होऊन श्री विठूमाऊलीचे दर्शन घेत आहे, परंतु या वर्षी आपली वारी मुकणार असल्याने प्रचंड दु:ख होत आहे. माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवून डोळे भरून घेतलेले दर्शन एक वेगळा अनुभव असतो, पण या वर्षी कोरोनाच्या लागलेल्या ग्रहणामुळे आपल्या माऊलीचे दर्शन डोळे भरून घेता येणार नाही याची खंत वाटते.
श्री विठूमाऊली वारकरी मंडळ बोईसर तारापूरतर्फे आयोजित करण्यात येणाºया श्री पंढरपूर वारी व दर्शन सोहळ्यामध्ये सहभागी होणाºया भाविकांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत असून सहभागी होणाºया प्रत्येकाला वारीचे वेध एक महिन्यापासून लागत असतात. - विठोबा मराठे, बोईसर, ता. पालघरमन अस्थिर, अस्वस्थही वाटते आहे!बोईसर : गेल्या ३५ वर्षांपासून मी श्री पंढरपूरवारीमध्ये अगदी न चुकता जात असून आषाढ महिना लागला की श्री विठ्ठल व रखुमाईच्या दर्शनाचे वेध लागतात. त्याचबरोबरच वारीत सहभागी होणाºया लाखो वारकऱ्यांची निस्सीम भक्ती व पांडुरंगावरील प्रेम पाहून तसेच वारकºयांमध्ये सहभागी झाल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती मिळते. मात्र या वर्षी कोरोनामुळे पांडुरंगाचे दर्शन व वारी सोहळ्याला मुकावे लागणार असल्याने मन अस्थिर होत असून अस्वस्थही वाटत आहे. माऊलीला डोळे भरून बघण्याची इच्छा या वर्षी अपूर्ण राहणार आहे, ही खंत सतावत आहे. आमच्या या वारी सोहळ्यात महिलाही मोठ्या प्रमाणात प्रचंड उत्साहात सहभागी होत असतात. - अशोक चुरी, मुरबे, ता. व जि. पालघरवारी चुकल्याची खंत, कायमच राहीलवाडा : गेल्या २५ वर्षांपासून नित्यनियमाने आम्ही पंढरीची वारी करीत आहोत. कितीही कामाचा व्याप असला तरी बाजूला सारून आम्ही सप्तमीलाच पंढरपुरात दाखल होतो. विठूमाऊलीचे दर्शन झाले की तहान-भूक हरखून जाते. एक आठवडा मुक्काम करून आम्ही घरी निघतो. घरी आल्यावर आम्हाला पुन्हा कामाची नवीन ऊर्जा पाप्त होते. वारीचा आनंद काही वेगळाच असतो. पंढरपुरात अनेक साधूसंतांचे दर्शन घडते. आषाढी एकादशीची वारी चुकल्याची खंत मात्र कायमच राहणार आहे. कोरोना महामारीमुळे उद्याची एकादशी पूर्ण दिवस मनोभावे पांडुरंगाची पूजा, भजने गाऊन घरीच साजरी करून कोरोना व्हायरसमुक्त देश कर, असे एकच साकडे विठूमाऊलीला घालणार आहे. - पांडुरंग पठारे, कळंभे, ता. वाडापांडुरंगच करील, संकटातून सुटकावाडा : वारकरी संप्रदायात आल्यापासून नियमितपणे ३८ वर्षे मी पंढरीची वारी करतो आहे. परंतु या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे वारीच रद्द झाल्याने यंदा महाराष्ट्रासह देशभरातले, जगभरातले सर्वच वारकरी हिरमुसले असून माऊलीचे दर्शन होणार नसल्यामुळे प्रचंड बेचैनही झाले आहेत. मागे पुढे उभा, राही सांभाळीत । आलीया आघात, निवराया ॥ कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरची वारी बंद करण्यात आलेली आहे. मात्र या संकटकाळात श्री पांडुरंगच देशासह संपूर्ण महाराष्ट्राची यातून सुटका करील, ही भावना. - लडकू शेलार, चांबळे, ता. वाडा