शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

विधानसभा मतदारसंघाचे बालेकिल्ले शाबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:04 AM

या लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय झालेली मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच पक्षांनी आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.

पालघर : या लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय झालेली मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच पक्षांनी आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.डहाणू विधानसभा मतदार संघातून भाजपाचे पास्कल धनारे हे आमदार आहेत. येथून राजेंद्र गावीत यांना ४९ हजार १८१, किरण गहला यांना ४२ हजार ५१७, श्रीनिवास वनगा यांना ३८ हजार ७७८, दामू शिंगडा यांना ५ हजार ९५५, बळीराम जाधव यांना ५ हजार ४८४, शंकर भदादे यांना १ हजार ६ तर संदीप जाधव यांना १ हजार ७२९ मते मिळाली असून ४ हजार ४४६१ मतदारांनी नोटा (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले.असे मिळून डहाणू विधानसभा मतदार संघात १ लाख ४९ हजार २११मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.विक्र मगड विधानसभाविक्रमगड विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विष्णू सवरा हे आमदार आहेत. येथून राजेंद्र गावीत यांना ५६ हजार ५१८, श्रीनिवास वनगा यांना ५१ हजार १६४, किरण गहला यांना १६ हजार १०९, बळीराम जाधव यांना १३ हजार २९७, दामू शिंगडा १२ हजार ७४७, संदीप जाधव यांना १ हजार ९१८, शंकर भदादे १ हजार ५०१ मते मिळाली असून ४ हजार ५३ मतदारांनी नोटा ला मतदान केले.असे मिळून विक्र मगड विधानसभा मतदार संघात १ लाख ५७ हजार ३०७ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केलेपालघर विधानसभापालघर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे अमित घोडा हे आमदार आहेत. त्या मतदारसंघातून राजेंद्र गावीत यांना ५६ हजार २१३, श्रीनिवास वनगा यांना ५४ हजार ४५३, बळीराम जाधव यांना १३ हजार ६९०, दामू शिंगडा यांना ८ हजार ७३६ किरण गहला यांना ६ हजार ५९१, संदीप जाधव यांना १ हजार ३३७, शंकर भदादे यांना ८०९ मते मिळाली असून ३ हजार ७४ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले. असे मिळून पालघर विधानसभा मतदार संघात १ लाख ४४ हजार ९०५ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.बोईसर विधानसभाबोईसर विधानसभा मतदार संघात बविआचे विलास तरे हे आमदार आहेत. येथून श्रीनिवास वनगा यांना ४९ हजार ९९१, बळीराम जाधव यांना ४ हजार ७५४, राजेंद्र गावीत यांना ४१ हजार ६३२, किरण गहला यांना ४ हजार ९६०, दामू शिंगडा यांना ४ हजार ३७४, संदीप जाधव यांना १ हजार ७२ तर शंकर भदादे यांना ८१४ मते मिळाली असून २ हजार २२६ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले, असे मिळून बोईसर विधानसभा मतदार संघात १ लाख ५१ हजार ८२३ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.नालासोपारा विधानसभानालासोपारा विधानसभा मतदार संघात बविआचे क्षितिज ठाकूर हे आमदार आहेत. येथून बळीराम जाधव यांना ७९ हजार १३४, राजेंद्र गावीत यांना ३७ हजार ६२३, श्रीनिवास वनगा यांना २७ हजार २६५, दामू शिंगडा यांना ३ हजार ६६२, किरण गहला यांना ७८६, शंकर भदादे यांना ३०६ तर संदीप जाधव यांना २७४ मते मिळाली असून १ हजार ४०६ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले, असे मिळून नालासोपारा विधानसभा मतदार संघात १ लाख ५० हजार ४५६मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.वसई विधानसभावसई विधानसभा मतदारसंघात बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे आमदार आहेत. तेथून बळीराम जाधव यांना ६४ हजार ४७८, राजेंद्र गावीत यांना ३१ हजार ६११, श्रीनिवासवनगा यांना २१ हजार ५५५, दामू शिंगडा यांना १२ हजार २३९, किरण गहला यांना ९२४, शंकर भदादे यांना ३४८ तर संदीप जाधव यांना ३३९ मते मिळाली असून १ हजार ६६४ मतदारांनी नोटाला (यापैकी कोणालाही नाही) मतदान केले. असे मिळून वसई विधानसभा मतदार संघात १ लाख ३३ हजार १५८ मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले.वरील आकडेवारी पाहता बोईसर विधानसभा मतदार संघात बविआच्या उमेदवारापेक्षा शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा व भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पडलेली अधिक मते वगळता जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून पक्षिय बलाबल पूर्वी सारखेच राहिले आहे. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018