शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

जळालेल्या वाहनामुळे सहायक वनसंरक्षक, क्षेत्रपाल अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 6:32 AM

जळाऊ लाकडांचे भारे वाहणारे वाहन जव्हार वनविभागाच्या कस्टडीत असताना अचानक जळून खाक झाल्याने जव्हार येथील तत्कालीन सहायक वनसंरक्षक एस.व्ही. राजवाडे व वनक्षेत्रपाल डी.व्ही. ठाकूर अडचणीत आले आहेत.

- अजय महाडीकमुंबई - जळाऊ लाकडांचे भारे वाहणारे वाहन जव्हार वनविभागाच्या कस्टडीत असताना अचानक जळून खाक झाल्याने जव्हार येथील तत्कालीन सहायक वनसंरक्षक एस.व्ही. राजवाडे व वनक्षेत्रपाल डी.व्ही. ठाकूर अडचणीत आले आहेत. मार्च २०१६ तील हे प्रकरण दंडआकारणीने मिटवण्याचे अधिकार असतानादेखील तब्बल आठ महिने टाइमपास करणे, त्यांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी आदिवासी असणारे वाहनाचे मालक काशिराम रामजी कोकाटे यांनी वनअधिकाऱ्यांनी संगनमत करून ते जाळल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, जव्हार वनविभागाचे उपवनसंरक्षक यांनी राजवाडे यांच्यावर प्रकरण निष्काळजीपणे हाताळल्याचा ठपका ठेवला आहे.येथील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये पावसाळ्याअगोदरची बेगमी करताना इतर जिन्नसांबरोबरच इंधनासाठी जळाऊ लाकूडफाटा एकत्र केला जातो. त्यानुसार, वरसाळे येथील बुधा रामा हिरवा यांच्या परसातील सुक्या लाकडांचे तीन भारे घेऊन कोकाटे आपल्या बोलेरो गाडीने चालले असताना नंदनमाळ येथे त्यांच्यावर वनविभागाने कारवाई केली. मात्र, याप्रकरणी गाडी पकडली असली, तरी कुणासही अटक करण्यात आली नाही की, कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली नाही. वास्तविक, कोकाटे कुटुंबीयांनी ते वाहन आपल्या बेरोजगार मुलाला रोजगार मिळावा म्हणून बॅँकेतून कर्जाऊ घेतले होते. अद्याप त्या कर्जाचे ३६ हप्ते फेडणे शिल्लक असल्याने बॅँकेनेही तगादा लावला आहे. दरम्यान, वनविभागाने आठ महिने वाहन कस्टडीत ठेवल्याने बेरोजगार झालेल्या कोकाटेंना इन्शुरन्सही भरता आला नाही. त्यामुळे रिलायन्स फायनान्सने जळून गेलेल्या वाहनाची भरपाई देण्यास नकार दिला आहे.पकडलेल्या सरपनाची किं मत अवघी दीडशे रुपये असल्याचा उल्लेख घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यामध्ये असून नंतर कागद रंगवताना ती दोन हजार २० रुपये एवढी वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापूर्वी शिसव वनोपजाची मुद्देमालासह पकडलेली वाहने दंडात्मक कारवाई करून मुक्त करण्यात आली आहेत.याप्रकरणी वाहनमुक्त करण्याचे आश्वासन देऊन राजवाडे यांनी लाच घेतल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्री व महसूल व वनविभागाच्या सचिवांकडे निवेदनाद्वारे दाद मागण्यात आली असून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर वरिष्ठांचे ताशेरेमुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्या दालनामध्ये झालेल्या वनसंरक्षक व जप्त वाहनासंबंधी मासिक सभेला राजवाडे गैरहजर राहिल्याबद्दल तसेच सदर वाहने सरकारजमा करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबत त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.सावा, उत्तर जव्हार या वनक्षेत्रात गुन्हे दाखल करून पकडलेली तब्बल आठ वाहने बराच काळ कस्टडीत ठेवून निर्णय न घेतल्याने त्यांची प्रत खराब होऊन जप्त मालाचा दर्जाही घसरल्याने महाराष्टÑ नागरी सेवा वर्तणूक १९७९ प्रमाणे कर्तव्यतत्परता न दाखवणे व अत्यंत निष्काळजीपणे प्रकरणे हाताळणे तसेच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केल्याचा ठपका उपवनसंरक्षकांनी ठेवला आहे.जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत राजवाडे यांच्याकडून खुलासा मागण्यात आला आहे. तो न केलास एकतर्फी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.एस.व्ही. राजवाडे यांनी जळालेल्या महिंद्रा बोलेरोप्रकरणी अहवाल सादर न केल्यास ते महाराष्टÑ नागरी सेवा नियम १९७९ अन्वये कारवाईस पात्र ठरतात, तसेच प्राधिकृत अधिकारी म्हणून त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे, असा अभिप्राय उपवनसंरक्षक डॉ. सिवबाला एस. (भा.व.से) यांनी नोंदवला आहे.प्राधिकृत अधिकारी असल्याने गंभीर नसलेल्या प्रकरणामध्ये न्यायबुद्धीने दंडआकारणी करून ती वाहने सोडण्याचे अधिकार मला होते. मात्र, पूर्वी तशी वाहने सोडल्याने वरिष्ठांकडून माझ्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे काशिराम कोकाटे यांच्या प्रकरणामध्ये जैसे थे भूमिका घेतली.- एस.व्ही. राजवाडे, सहायक वनसंरक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या