शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 8:54 PM

भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे.

ठळक मुद्देभाईंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे.सद्या खचलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनीच दगडं ठेऊन अपघात घडु नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपर्वी याच भागात रस्त्या लगतच्या तलावाची कुंपण भिंत कोसळली होती.भाईंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे. शिवाय एस्सेलवर्ल्ड, ज्युडिशीयल अकदामी, केशवसृष्टी साठी सुध्दा वाहनाने जाण्यास हाच रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ असली तरी डोंगरी ते आनंद नगरपर्यंत रस्ता तसा अरुंदच आहे. येथून कचरा वाहुन नेणारे डंपर, परिवहन सेवेच्या बस , डंपर आदी अवजड वाहने देखील भरधाव जात असतात. यंदाचा पावसाळा सुरु झाला तेव्हा आनंद नगर येथील रस्त्या लगत असलेल्या तलावाची कुंपण भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे.त्यातच आज गुरुवारी सदर तलावा पासुन जवळच असलेल्या विहरी लगतचा रस्ता खचला आहे. रस्त्याचा काही भाग खचुन पडला असुन उर्वरीत काही भागास लांब भेग पडली आहे. रस्ता खचल्याचे कळताच स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पालिकेच्या बांधकाम विभागास याची माहिती देऊन सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सद्या खचलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनीच दगडं ठेऊन अपघात घडु नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदर रस्त्याच्या उजव्या बाजुस खोल भागात शेती असुन त्यामुळे डावी कडील डोंगरावरुन येणाराया पाण्याच्या प्रवाहाने खालची माती वाहुन जात असल्याने रस्ता खचल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षाbhayandarभाइंदर