वाडा : वाडा ग्रामपंचायतीचे सदस्य व बहुजन विकास आघाडीचे शहर अध्यक्ष देवेंद्र रघुनाथ भानुशाली व त्यांची मुलगी ख्याती यांच्यावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास राकेश जैन व त्यांच्या कुटुंबियांनी घरात शिरुन रॉड व दांडक्यांनी हल्ला केला. त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राकेश जैन, वंदना जैन, जितेंद्र जैन व राजेद्र जैन यांना अटक करण्यात आली असून भाडोत्री गुंड पसार झाले आहेत. देवेंद्र भानुशाली व राकेश जैन हे दोघेही फर्निचर व भांड्यांचे व्यापारी आहेत. दोघांचेही व्यवसाय वाडा बाजारपेठेत असून बाजारपेठेतील एका जागेवरुन या दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. तो न्यायप्रविष्ट असतांनाही आज ही मारहाण झाली. (वार्ताहर)
बविआच्या शहराध्यक्षांवर हल्ला
By admin | Published: December 22, 2016 5:34 AM