डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील प्रमुख फळपीक चिकूचे अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे चिकू बागायतदार आणि मजुरांना आर्थिक फटका बसला असून असून त्यांना तत्काळ मदत मिळावी याकरिता विधान परिषदेचे आ. आनंद ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात बुधवार, १८ डिसेंबर रोजी लक्षवेधी सूचना मांडली.
पालघर जिल्ह्यात चिकू हे प्रमुख फळपीक आहे. येथील पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, वसई आणि वाडा या तालुक्यांमध्ये बागायती असून त्याद्वारे सर्वाधिक रोजगार निर्माण होतो. मात्र २७ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत झालेली अतिवृष्टी आणि दोन चक्रीवादळसदृश परिस्थितीचा फटका बसला. त्यामुळे झाडांवरील चिकूफळे, कळ्या गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिकदृष्ट्या हवालदिल बनला असून वर्षभर रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ बागायतीत काम करणाºया मजुरांवर ओढवल्याची बाब विधान परिषद आ. आनंद ठाकूर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बुधवारी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली. येथील उत्पादकांनी राज्याचे कृषीमंत्री, महसूल मंत्री तसेच पालघर जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक यांना लिखित निवेदन दिले आहे. मात्र प्रशासनाने त्याची अद्याप दखल न घेतल्याने उत्पादकांमध्ये कमालीचा संताप असून तत्काळ या भागाची पाहणी करून आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय भात, नागली, तूर आदी खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याचेही ठाकूर म्हणाले.
दरम्यान ९ डिसेंबर रोजी डहाणू पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघातर्फे चिकू बागायतदारांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकरी व बागायतदार यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात आ. ठाकूर यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधून चिकू पीक विम्याबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शेतकºयांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन दिले होते. मात्र यावेळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने आमदारांनी दिलेल्या वचनपूर्तीबाबत संभ्रमावस्था होती. परंतु त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शब्द पाळल्याने स्थानिकांत समाधानाची भावना असून त्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल सोशल मीडियावर आभार व्यक्त होत आहेत.भरपाई मिळण्याची शेतकºयाला आशाचिकू नुकसानीचा प्रश्न या पूर्वी खासदार राजेंद्र गावीत यांनी संसदेत मांडून शेतकºयांना २५ हजार रुपये तर चिकू उत्पादकांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अधिवेशनाच्या माध्यमातून दोन्ही लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील शेतकºयांचा प्रश्न उपस्थित केल्याने नुकसानभरपाई मिळण्याच्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.