शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती, रॅली, पथनाट्याचे आयोजन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:48 PM

महिनाभर चालणार मोहीम : रॅली, पथनाट्याचे आयोजन

बोईसर : बाल कामगार प्रथेविरुद्ध ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहीमेमध्ये मालक तसेच चालकांकडून बाल कामगार न ठेवण्याबाबतचे हमीपत्र घेणयाबरोबर विविध कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन, सर्व व्यवसायातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालक संघटनांची बैठक घेऊन सुधारित बाल कामगार अधिनियमाची माहिती देण्यात येणार असून रॅली तसेच पथनाट्याचे आयोजन केले आहे. पत्रके वाटून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घरेलू कामगार म्हणून बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत आवाहन करणे आदी जनजागृतीचे कार्यक्रम राबवायचे आहेत. या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यासंबंधात कामगार आयुक्त कार्यालयाने तहसीलदार रेवननाथ लबडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कामगार उपायुक्त कि.वि. दहिफळकर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, राजेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मोक्षदा माशाळकर, जिल्हा बालसंरक्षण, विलास पिंपळे, उपशिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) जि.प. पालघर, डॉ. अजय ठाकरे, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. पालघर, संकेत कानडे, सदस्य सचिव तथा सहा. कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त कार्यालय, पालघर, राजेंद्र चव्हाण, सरकारी कामगार अधिकारी, कामगार उपायुक्त कार्यालय, पालघर व अरविंद नाईक, वसई विरार शहर मनपा आदी उपस्थित होते. शासन निर्णय २ मार्च २००९ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पालघर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना केली असून यामध्ये विविध विभागांच्या अधिकाºयांचा तसेच अशासकीय सदस्यांचा समावेश आहे.जनजागृतीसोबत धाडसत्रही राबवणारबालकामगार ही अनिष्ट प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक निकषाशी निगडीत असल्याने या प्रथेविरु द्ध विस्तृतपणे जनजागृती होणे आवश्यक असल्याने कामगार आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार मोहीम राबविणेबाबत तसेच धाडसत्राचे आयोजन करण्याबाबत सूचित करून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाल्याचे कृतीदल प्रमुखांच्यावतीने तहसीलदार रेवननाथ लबडे यांनी घोषित केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर