शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात सुविधांअभावी बाळ पोटातच दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 5:02 AM

ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा व्यवस्थित नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे बाळ पोटातच दगावले.

मनोर : ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा व्यवस्थित नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे बाळ पोटातच दगावले. मागील तीन महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे. आरोग्य विभाग किती निष्पापांचे बळी घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.नवी दापचरी येथील वंदना अंबाथ हिला शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पती रवींद्र व कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या. तिथे कार्यरत असलेल्या डॉ. समीक्षा पाटील व आरोग्यसेविका लोखंडे व इतर आरोग्य कर्मचारी नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न करीत होते. तिची प्रकृती गंभीर झाल्याने रवींद्रनी डॉक्टरांना सिझेरियन करण्यास सांगितले. कंत्राटावर असलेल्या डॉक्टरशी संपर्ककेलापण ते न आल्याने शनिवारी पहाटे चारच्या सुमारास बाळ आईच्या पोटातच दगावले. त्यानंतर त्यास बाहेर काढले.याबाबात रवींद्र म्हणाले की, माझ्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने मी त्या डॉक्टरांना सिझेरियन करायला सांगितल्यावर त्यांनी तुमच्याकडे पैसे आहेत का? सिझेरियन येथे होेणार नाही त्यासाठी पुढे जावे लागेल, असे सांगितले. डॉक्टर व आरोग्यसेविकांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावले. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.>आम्ही प्रयत्न केलेबाळाने पोटात शी केली होती. त्याचे ठोकेही कमी झाले होते. त्यांना सांगितले पुढे घेऊन जा पण ते गेले नाही. पूर्ण महिनही झाले नसल्याने बाळाचे वजन कमी होते. आम्ही प्रयत्न केले असे डॉ. समीक्षा पाटील म्हणाल्या. सिव्हील सर्जन डॉ.कांचन वानिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या मला माहीत नाही मी चौकशी करते.