शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

विना ओसी इमारतींवर बडगा, वसई महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 2:47 AM

वसई महापालिकेचा निर्णय : हे तर, चोर सोडून संन्याशाला फाशी - भाजप

पारोळ : वसई-विरार महापालिकेने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी वसई-विरार शहरातील ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नाही त्या इमारतीमधील रहिवाशांना शास्ती आकारण्यास सुरवात केल्याची माहिती नगर रचना विभाग प्रमुख संजय जगताप यांनी नुकतीच दिली, हा सर्व प्रकार केवळ संतापजनक नाही तर बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांकडून फसवणूक झालेल्या लाखो रहिवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाने केली आहे.

या महापालिका क्षेत्रामधील बहुसंख्य सदनिकाधारकांची बांधकाम व्यावसायिक आणि विकासक यांनी अधिकृत बांधकामाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. भोगवटा पत्र नसताना किंवा पार्ट ओसी (भोगवटा पत्र) घेऊन लोकांना सदनिकांमध्ये राहण्यास भाग पाडले. महापालिकेकडून त्या सदनिकांना अधिकृत घरपट्टी, नळ जोडणी तसेच महावितरणकडून वीज जोडणी सुद्धा मिळवून दिली आणि आता महापालिका अशा रहिवाशांना शास्ती लावत आहेत. ही प्रचंड बाब आहे, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असून बांधकाम व्यावसायिक, विकासक, वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) आणि महापालिका अधिकऱ्यांना वाचविण्यासाठी सामान्य रहिवाशांचा बळी महापालिका प्रशासन देत आहे, असा आरोप भाजपने केला आहे

बांधकाम परवाना देणे आणि भोगवटा पत्र देणे, या पलीकडे नगर रचना विभागाचे काहीच काम नाही का? एकदा बांधकाम परवा दिला आणि केवळ जोते प्रमाणपत्र दिले कि नगर रचना विभाग किंवा महापालिका अधिकारी त्या बांधकामाकडे ढुंकून ही बघत नाहीत, कितीही तक्रारी केल्या तरी कागदी घोडे नाचवण्यापलीकडे महापालिका प्रशासन काही करत नाही, आणि मग महापालिका अधिकाºयांच्या आशिर्वादाने विकासक मनमानी बांधकाम करून सदनिका धारकांना ते अधिकृत भासवून राहण्यासाठी देत आहेत. इतर महापालिकां प्रमाणे प्रत्येक माळा तसेच प्रत्यके टप्प्यामध्ये त्याची तपासणी होऊन परवान्याप्रमाणे काम होते आहे कि नाही, हे बघण्याची जबाबदारी नगर रचना विभागाची आहे परंतु आपली जबाबदारी नीट पूर्ण न करता सर्वसामान्यांना वेठीस धरणाºया महापालिकेने प्रथम अनधिकृत बांधकामे करणारे बिल्डर, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना सहकार्य करणारे आर्किटेक्ट, महापालिका व नगररचना विभागाचे अभियंता व नगररचना विभागाचे , भोगवटा प्रमाणपत्र नसतांना नियमीत घरपट्टी लावणारे, भोगवटा पत्र नसताना नळ जोडणी देणारे अधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार आहे तसेच या सर्वांवर गुन्हे कधी दाखल होणार याचा तपशील द्यावा. या सर्वाना पाठीशी घालणारे नगररचना अधिकारी व महापालिका अधिकारी याच्यावर कारवाई कधी होणार?*चोर सोडून सामान्य करदात्याला छळण्याचा हा प्रकार महापालिकेच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. हिम्मत असेल तर महापालिकेने बिल्डर, आर्किटेक्ट महापालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करून दाखवी आणि मगच सदनिकाधारकाला बांधकाम नियमित करण्यासाठी दंड ठोठवावा.-मनोज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार