पालघर : सफाळे भागात बेकायदेशीर रित्या रुग्णावर उपचार करणा-या एका बोगस डॉक्टराला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात आपली दुकाने थाटून अजूनही रु ग्णास लुटणाºया बोगस डॉक्टरांविरोधात व्यापक कारवाई होणार कधी? असा सवाल केला जात आहे.पालघर तालुक्यात १० प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांनी आपल्या भागाच्या दिलेल्या अहवालात एकही बोगस डॉक्टर नसल्याचे कळविले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खंदारे ह्यांनी लोकमतला दिली. मात्र आजही पालघर तालुक्यात अनेक गावागावात कुठलीही पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांची दुकानदारी कशी सुरू आहे. आज अनेक डॉक्टर परवानगी नसताना अॅलोपॅथी ओषधाचा बिनधास्त वापर करून रु ग्णांच्या जीविताशी खेळत आहेत. सफाळे येथे मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या व पाईल्स क्लिनिक चालविणाºया प्रशांतजीत किर्तनीया यांनी बीएएमएसआर अशी पदवी आपल्या नावा समोर चिकटवून दुकान थाटले होते. या डॉक्टरांकडे कुठलीही अधिकृत पदवी नसतांना त्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्या बाबत सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून माहिती मिळाल्या नंतर सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठाकूर ह्यांनी क्लिनिकवर धाड टाकून किर्तनीया यास शनिवारी अटक केली आहे.वैद्यकीय सेवा पुरविणाºया डॉक्टरांना आपली नोंद योग्य त्या कागदपत्रांसह महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलकडे केल्यानंतर त्यांना सिव्हिल सर्जन, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत ह्यांच्याकडे आपल्या पदवीची कागदपत्रे नोंदविल्यानंतर त्यांना आपला व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाते.पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून आजही ग्रामीण भागातील रुग्णांना हव्या तशा वैद्यकीय सेवा मिळत नाहीत.ह्याचा फायदा घेत अनेक भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे.>व्यापक मोहीम राबवाया बोगस डॉक्टरांनी एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेण्या आधीच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड ह्यांनी कडक पावले उचलण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे. सर्वच डॉक्टरांच्या व्यावसायिक दस्तऐवजांची तपासणीची मोहीम राबविल्यास अनेकांचा भंडाफोड होणार आहे.
सफाळे परिसरात बोगस डॉक्टरला अटक, अनेकांचा गोरखधंदा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 2:49 AM