शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : बविआच्या क्षितिज ठाकूर यांची विजयाची हॅटट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 2:10 AM

४३ हजार ८१५ मतांनी विजयी; मतदारसंघात भाजपची नाराजी सेनेला भोवली

- मंगेश कराळेनालासोपारा : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नालासोपारा मतदारसंघात बविआचे क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांची उमेदवारी घोषित झाल्याने ही लढत अटीतटीची होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. पण क्षितिज ठाकूर यांनी नगरसेवक, नगरसेविका, नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर प्रदीप शर्मा यांना सहज मात देत तब्बल ४३ हजार ८१५ मतांनी ही निवडणूक जिंकून विजयाची हॅट्रिक साधली आहे. एकूणच या विजयाने नालासोपाऱ्यात पिवळे वातावरण पसरून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्रीप्रस्था येथील बविआच्या भवन कार्यालयावर भव्यदिव्य जल्लोष साजरा केला आहे.

क्षितिज ठाकूर पुन्हा एकदा विजयी झाल्याने बविआने नालासोपाºयाचा गड राखल्याची चर्चा असून क्षितिज यांनी प्रदीप शर्मा यांचा राजकीय एन्काऊंटर केल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम ठेवत शेवटच्या फेरीपर्यंत निर्विवाद आघाडी ठेवत विजयश्री खेचून आणली आहे.

कार्यकर्ता जिंदाबाद असून त्याच्या अपार मेहनतीमुळे तसेच येथेच राहणारे असल्याने आम्ही १२ ही मिहने लोकांच्या संपर्कात असून आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याचा जो प्रयत्न करतो तसेच आजपर्यंत केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदानासाठी बाहेर काढतात त्यामुळे या विजयाचे खरे शिल्पकार कार्यकर्ते आहेत.- क्षितिज ठाकूर (आमदार, नालासोपारा मतदार संघ)

पोलिसांचा चोख बंदोबस्त.....

या विधानसभेत टफ फाईट असल्याने व प्रचार संपलेल्या दिवशी झालेल्या राड्यामुळे मतदान मोजण्याच्या दिवशी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालघर पोलिसांनी चोख बंदोबस्त श्रीप्रस्था मधील वृन्दावन गार्डन मधील स्ट्रॉंगरूम व आजूबाजूच्या परिसरात ठेवण्यात आला होता. यावेळी २ पोलीस उपविभागीय अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, १६ पोलीस अधिकारी, १४० पोलीस कर्मचारी, १ शीग्र दलाचे प्लाटून, २ राखीव पोलीस दलाचे प्लाटून, २० वाहतूक पोलीस कर्मचारी असा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी लोकमतला बोलताना सांगितले आहे.

सेना आणि भाजपने आत्मचिंतन करणे गरजेचे

गुरुवारी पार पडलेल्या नालासोपारा विधानसभेत सेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांचा क्षितिज ठाकूर यांनी पराभव केला आहे. महायुतीने आयात उमेदवार याठिकाणी देऊन आणि भाजपला जागा न सोडल्याने पराभव झाल्याचे मुख्य कारण आहे. या पराभवानंतर भाजपा आणि सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंनी आपसातील वाद, राग, रु सवे विसरून एकित्रत येऊन लढल्याशिवाय बविआचा पराभव होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे त्यामुळे दोन्ही पक्षांनी याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे असून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांंमध्ये शांतता पसरली असून कार्यलये देखील बंद ठेवण्यात आली होती.

नाराज भाजपचा फटका सेनेला.....२०१९ मध्ये नालासोपारा विधानसभेची जागा मिळावी, यासाठी भाजप जिल्हा सरचिटणीस आणि जेष्ठ नेते राजन नाईक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २०१४ पासूनच जोरदार तयारी सुरू केली होती. घरोघरी जाऊन प्रचार करत अडचणीतील लोकांच्या समस्या सोडवत प्रत्येकाला मदत करत होते. निवडणुकीच्या अगोदर २७ हजार नवीन मतदारांची नोंदणी करून घेतली होती पण ही जागा भाजपाला न देता सेनेला दिल्याने भाजपमध्ये नाराजी होती.

सेनेच्या नेत्यांनी भाजपची ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला पण खा. राजेंद्र गावित आणि राजन नाईक यांना शिविगाळ करण्यात आलेली ऑडीओक्लिप सोशल मीडियावर वायरल झाली आणि त्या व्यक्तीवर कडक किंवा कायदेशीर कारवाई केली नाही आणि संबंधित व्यक्ती प्रचारात सहभागी झाल्यास भाजपचा कोणताही पदाधिकारी, कार्यकर्ता सेनेचा प्रचार करणार नाही असा आक्र मक पवित्रा घेतल्याने बविआच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आता सुरू असून नाराज भाजपाचा फटका बसल्यानेच सेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा पराभूत झाले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nalasopara-acनालासोपाराvasai-acवसई