मनोर : जंगलपट्टी भागात येणाऱ्या बांगरचोळा जिल्हा परिषद मराठी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कार्यानुभवातून गावकºयांना आगळी वेगळी दिवाळी भेट दिली.मनोर जवळील बांगरचोळा जि. प. मराठी शाळेतील आदिवासी मुलांनी दिवाळीसाठी मातीपासून पणत्या तयार केल्या. तसेच आकाश कंदील तयार केले. मुलांनी एक आकाश कंदील व दोन पणत्या आपल्या गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन दीपावलीच्या शुभेच्छांसह दिल्या. मुलांनी शाळेतील माजी शिक्षक रोटकर सर, निलकंठे सर, पवार सर यांना दिवाळी शुभेच्छा कार्ड व आकाश कंदील भेट दिले. मुलांनी अगदी टाकाऊ वस्तू म्हणजे पिण्याच्या पाण्याची बॉटल जी सहज उपलब्ध होते, त्यापासून आकाश कंदील बनवले. पाणी पिऊन ती बॉटल परिसरात फेकून दिली जाते त्यातून पर्यावरणाची हानी होते, अशा टाकाऊ वस्तूपासून मुलांनी एक बॉटल आणि फुग्यापासून तसेस कार्डपेपर वापरून आकर्षक सुंदर आकाश कंदील बनवले होते ते बघून मुलांचे पालक गावकरी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. मुलांना आणि शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ह्या उपक्रमामध्ये शाळेचे प्रमुख शिक्षक बाळू गोटे आणि सह शिक्षक प्रकाश राव यांनी मेहनत घेतली म्हणून सर्वांनी कौतुक केले. या आधीही त्यांनी रक्षाबंधन च्या वेळी राख्या तयार केल्या होत्या, अशा उपक्र मातून शाळेत मुलांची उपस्थिती वाढणार आणि कार्यानुभव या विषयाबाबत मुलांची आवड निर्माण होईल असे मत केंद्र प्रमुख गजानन पाटील यांनी मांडले व मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.
बांगरचोळे जि.प. शाळेने दिली अनोखी दिवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 11:02 PM