विरार - सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत.तर यांच्यावर कारवाई करणाऱ्या सागरी किनारा सुरक्षा बोटी देखील बंद करण्यात आल्या असल्याने त्यांना मासेमारांना पकडणे अवघड होत आहे.पावसाळ्याच्या सुरवातीला चक्री वादळाची शक्यता जाणवत असल्याने तसेच माशांच्या प्रजोत्पन्नाचा हा काळ असल्याने समुद्रामध्ये मासेमारी पूर्णत: बंद करण्याचा आदेश सरकार कडून देण्यात आला आहे. तर सर्वत्र मासेमारी बंद असून बोटी किनाºयाला लागल्या आहेत परंतु काही मासेमार हे आर्थिक हव्यासापोटी अजूनही पाण्यात उतरत आहेत. पावसाळ्यात पाण्यात उंच उंच लाटांमुळे होडीवर ताबा मिळवता येत नाही तर अनेकदा होडी वाहून जाते. खाडी मधील मासेमारी (बिगर यांत्रिकी) मासेमारी सुरु असली तरी त्या ठिकाणी मासे मिळाले नाही तर मच्छीमार खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न करतात. खाडीच्या अर्धा कि.मी पुढे गेल्यानंतर परत येणे शक्य होत नाही तर काही मच्छीमार हे माश्यांच्या शोधात खोलवर जातात व आपला जीव गमावतात.विशेष म्हणजे पावसाळ्यात सागरी किनारा सुरक्षा पथकाच्या बोटी देखील बंद असल्याने अशा मच्छिमारांना मर्यादा येतात. मच्छीमार सोसायटी या त्यांच्यावर कारवाई करतात. त्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. तसेच, त्या बोटीचा विमा देखील रद्द केला जातो जर त्या बोटीचा विमा असेल तर तो मासेमारांना मिळत नाही. आता पर्यंत अशा अनेक घटना घडल्या असून यावर रोक लावण्याचा प्रयत्न मच्छीमार सोसायट्या व सागरी किनारा रक्षक करत आहेत. बोटी खोल समुद्रात गेल्यानंतर त्यांना नौदलाची बोट वाचवू शकते मात्र पावसाळ्यात अपघाताची शक्यता जास्त असते.मासेमारी हा त्यांचा मूळ व्यवसाय असल्याने त्यांच्या वर पूर्ण पणे रोक लावता येत नाही परंतु गंभीर गुन्हा असेल तर आम्ही गुन्हा नोंदवतो.-विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधिक्षक,निसर्गाचा -हास होतोच पण त्यांच्या जीव देखील धोक्यात येतो. पावसाळ्यात वादळ असले की, पेट्रोलिंग देखील बंद असल्याने त्यांच्या सुरक्षेची खात्री नसते.- रवींद्र पाटील, सागरी सुरक्षा अधिकारीखाडी मधील मासेमारी सुरु आहे. ती बंद झालेली नाही मात्र, मच्छीमार जर समुद्रात जात असतील तर तो गुन्हा आहे. काही बोटी लांबच्या दौºयावर गेलेले असतात त्यांना परतण्यास वेळ लागतो म्हणून मासेमारी बंद झाल्यानंतर ही ते समुद्रात दिसतात.- संजय कोळी, अध्यक्ष,मच्छीमार समिती
बंदीआदेश पायदळी तुडवत मच्छीमारी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:06 AM