शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

पालकमंत्र्यासाठी वाड्यातील लढाई कठीण, विकासाअभावी भाजपाची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:45 AM

शहाराला नागरी समस्यांनी घेरले आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता या प्रमुख नागरी समस्या सोडविण्यात भाजपचे विद्यमान मंत्री विष्णू सवरांना आलेल्या अपयशामुळे येत्या १३ डिसेंबरला होत असलेल्या वाडा नगर पंचायतीच्या निवडणूकीत भाजपची पूरती कोंडी झाली असून

वाडा : शहाराला नागरी समस्यांनी घेरले आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता या प्रमुख नागरी समस्या सोडविण्यात भाजपचे विद्यमान मंत्री विष्णू सवरांना आलेल्या अपयशामुळे येत्या १३ डिसेंबरला होत असलेल्या वाडा नगर पंचायतीच्या निवडणूकीत भाजपची पूरती कोंडी झाली असून मतदारांपुढे कोणता विकासाचा अजेंडा घेऊन जायचा असा यक्षप्रश्न आहे.शहराने कायम भाजपवर विश्वास दाखवत सवरांना सलग पाच वेळा विधानसभेवर पाठवले. त्यामुळे शहरातील नागरी समस्या विशेषत: पाणी, अंतर्गत रस्ते व स्वच्छता या बाबतीत काही ठोस योजना आमदार म्हणून सवरांनी राबविणे आवश्यक होते. आजही प्रचंड विस्तारलेल्या शहराला वीस वर्षापूर्वी झालेल्या पाणी योजनेवर अवलंबून रहावे लागत आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. पावसाळ्यात तर अक्षरश: गढूळ पाणी प्यावे लागते. त्यामुळे भाजप ज्या मंत्री सवरांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढते आहे त्यांच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे.शहरातील मुख्य व गावातील रहदारीच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. सवरा गेली तीन वर्षे मंत्री पदावर आहेत मात्र या काळामध्ये शहरातील एकही रस्ता होऊ शकला नाही. तसेच स्वच्छतेच्या प्रश्ना मोठी डोके दुखी ठरत असून डंपींग ग्राउंडसाठी लागणाºया जागेचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने तो सोडविण्यातही ते अपयशी ठरले आहेत.ते स्वत: गेली चाळीस वर्र्षे वाडा शहरात राहत असल्याने त्यांना येथील समस्यांची कल्पना आहे. त्यातच ते सलग २८ वर्ष ते आमदार आहेत. १९९५ साली सत्तेत आलेल्या युती सरकारमध्ये ते काही काळ आदिवासी विकास मंत्री होते तर सध्याच्या युतीसरकारमध्ये ते गेली तीन वर्षापासून आदिवासी विकास मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तरी देखिल शहराचा विकास होऊ शकला नाही. या बाबतची खंत मतदार उघडपणे बोलून दाखवत आहेत. त्यातच नगर पंचायतीच्या निवडणूकीत थेट जनतेतून निवडल्या जाणाºया नगराध्यक्ष पदाकरिता मंत्री सवरांची कन्या निशा सवरा ह्या निवडणूक लढत असल्याने विकासाआभावी भाजप पुढील आव्हाने वाढली आहेत.मनसेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अस्मिता शितोळेंची निवडणुकीतून माघारवाडा : वाडा नगरपंचायतीच्या होत असलेल्या सार्वित्रक निवडणुकीत गुरु वारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अस्मिता शितोळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर नगरसेवक पदाच्या ८ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.वाडा नगरपंचायतीची येत्या १३ डिसेंबरला निवडणूक होत आहे. यासाठी नगराध्यक्षपदाकरीता ६ वैध उमेदवारीअर्ज दाखल होते. त्यापैकी मनसेच्या शितोळेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता नगराध्यक्षपदाकरीता ५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर १७ प्रभागांमध्ये नगरसेवक पदाकरिता ८७ वैध उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी प्रभाग क्र मांक १ मधून ईश्वर कोम , कमळाकर भोईर, प्रभाग क्र मांक २ मधून विजय बोरसे, प्रभाग क्र मांक ५ मधून अक्षदा निमसे, प्रभाग क्र मांक ७ मधून भीम चव्हाण तर प्रभाग क्र मांक १० मधून शिवसेनेचे माजी सरपंच उमेश लोखंडे, दीपेश मुकणे, प्रणाली वेखंडे या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.जव्हारमध्ये ३ नगराध्यक्षपदाचे तर १२ नगरसेवकपदाचे अर्ज माघारीजव्हार : जव्हार नगर परिषदेसाठीची अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया गुरुवारी पार पडली. या प्रक्रियेत नगरसेवक पदासाठी भरण्यात आलेले १२ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून नगराध्यक्ष पदाचे ३ अर्ज मागे घेण्यात आले आहेत.मात्र प्रभाग क्र. ४, ७, ८ या प्रभागातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निश्चिती परस्पर झाल्यामुळे प्रथम उमेदवार व द्वितीय उमेदवार यांच्या निश्चितीबाबत राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतरच उमेदवारी निश्चित होणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिली. यात ८ प्रभाग असून १७ जागांसाठी ६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार नशिब आजमावणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ४, ७, ८, बाबतच्या अपिलाचा निकाल लागल्यानंतर तीन उमेदवार निश्चित होतील. तसेच नगराध्यक्ष पदाकरिता शिवसेनेकडून चंद्रकांत पटेल, राष्ट्रवादी संदीप वैद्य, जव्हार प्रतिष्ठानकडून भरत पाटील, तर काँग्रेसचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार दिलीप तेंडुलकर व अपक्ष उमेदवार अलताफ शेख अशा ५ उमेदवारांची निश्चिती झाली आहे.जव्हारमध्ये राष्टÑवादीला धक्कानिवडणूकीचे वारे जोर धरु लागले असून जव्हारच्या राजकारणाला वेगळीच कलाटनी मिळाली असून राष्टÑवादीचे विक्रमगड विधान सभेचे अध्यक्ष दिलीप तेंडूलकर यांना पक्षा कडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, राजकीय समिकरण बदलल्याने आघाडी न झालेल्या कॉग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश करून त्यांनी राष्टÑवादीला धक्का दिला. त्यामुळे जव्हारच्या राजकीय वातावरणात कमालीचे बदल बघावयास मिळाले आहे.आय. कॉग्रेसने धनंजय खेडकर यांचा अधिकृत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला होता.मतदारनोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंतपालघर : मतदान नोंदणी साठी केंद्रस्तरीय अधिकार्यांनी मतदारांच्या घरी जाऊन नोंदणी करण्या संदर्भात कामाची मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी साठी नमुना नं.६ किंवा मतदार नाव वगळणे कामी नमुना नं.७ व मतदार यादीतील तपशील दुरु स्ती कामी नमुना नं.८ हे अर्ज १५ डिसेंबर पर्यंत दाखल करता येतील असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी पालघर ह्यांनी कळवले आहे.तेंंडूलकर यांची अचानक एन्ट्री झाल्यामुळे खेडकर यांनी गुरुवारी शेवटच्या दिवशी आपला नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला असून, दिलीप तेंडूलकर यांना कॉग्रेसचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहिर करण्यात आले आहे. यावेळी दिलीप तेंडूलकर, धनंजय खेडकर, जिल्हा सरचिटणीस संदीप मुकणे, तालुका अध्यक्ष सोमनाथ किरकीरा, शहर अध्यक्ष फारूक मुल्ला, माजी तालुका अध्यक्ष भरत बेंदे्र, माजी नगरसेवक सैय्यद जमीर पिरजादा, खलील कोतवाल, तंझीम पिरजादा, महेंद्र मोरे, प्रतीक काजळे, जमशेद शेख, अशोक चौधरी आदि उपस्थित होते. या खेळीमुळे राजकीय कलगितुरा पहावयास मिळणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा