शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

बविआ, शिवसेना, कॉँग्रेसला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:16 AM

३१ मे रोजी पार पडलेल्या या लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत विविध पक्षोपपक्षांना जे मतदान झाले

नंदकुमार टेणी पालघर : ३१ मे रोजी पार पडलेल्या या लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत विविध पक्षोपपक्षांना जे मतदान झाले. त्याने बविआ, भाजपा व शिवसेनेला इशारा दिला आहे. २०१४ च्या विधानसभा मतदारसंघ निहाय पडलेली मते आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत याच पक्षांना विधानसभा मतदारसंघ निहाय पडलेली मते यांची तुलना केली तर वेगळेच चित्र हाती येते.विक्रमगड या विधानसभा मतदार संघात जव्हार मोखाडा आणि वाड्याचा काही भाग येतो या मतदारसंघाचे विद्यमान आमदार विष्णू सवरा आहेत. त्यांना ४०२०१ मते पडली होती. परंतु या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला ५६५१८ मते मिळाली आहेत. याचा अर्थ येथे भाजपची मते १६३१७ ने वाढली आहे. असे शिवसेनेच्या बाबतीतही घडले आहे. विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला ३६३५६ एवढी मते पडली होती. तर या लोकसभा पोटनिवडणुकीत या मतदारसंघात ५११६४ मते पडली आहे. म्हणजे शिवसेनेच्या मतात १४८०८ मतांनी वाढ झाली आहे. काँग्रेसला विधानसभेच्यावेळी ५३२४ मते मिळाली होती. तर या पोटनिवडणुकीत १२७४७ मते मिळाली. म्हणजे काँग्रेसची मते ७४२३ ने वाढलीत. बविआला विधानसभेत १८०८५ एवढी मते मिळाली होती. तर लोकसभेत १३२९७ मिळाली आहेत. याचा अर्थ येथे बविआची ४७८८ एवढी मते घटली आहेत.वसई या विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत बविआला ९७२९१ मते मिळाली होती. तर पोटनिवडणुकीत ही मते ६४४७८ एवढी मिळाली आहेत. म्हणजे या मतदारसंघात बविआची ३२८१३ मते घटली आहेत. भाजपाचा उमेदवार गेल्या विधानसभेला उभाच नव्हता. तर पोटनिवडणुकीत भाजपाला ३१६११ मते मिळाली आहेत. तर शिवसेनेला विधानसभा निवडणूकीत ६५३९५ मते होती, तर पोटनिवडणुकीत २१५५५ मते मिळाली आहेत. याचा अर्थ तिची ४३८४० मते घटली आहेत.डहाणू मतदारसंघात गेल्या विधानसभेत ४४८४९ मते भाजपाला मिळाली होती. तर पोटनिवडणुकीत भाजपाला ४९१८१ मते मिळाली आहेत. याचा अर्थ येथे भाजपची ४३३२ मते घटली. काँग्रेसला १४१६१ मते मिळाली होती. ती यावेळी ५९५५ झाली आहे. म्हणजे त्याचीही ८२०६ इतकी मते घटली आहेत. शिवसेनेची ७८४७ मते होती ती या निवडणुकीत ३८७७८ झाली आहे. म्हणजे तिची ३०९३१ एवढी मते यावेळी वाढली.पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची गेल्यावेळी ६७१२९ एवढी मते होती. ती या पोटनिवडणुकी ५४४५३ झाली. याचा अर्थ तिची १२६७६ मते घटली. काँग्रेसला ४८१८१ मते होती. ती या निवडणुकीत ८७३६ एवढी झाली म्हणजे काँग्रेसची ३९४४५ मते घटली. असेच बविआचे झाले. ३६७८१ एवढी तिची मते २०१४ मध्ये होती ती आता १३६९० एवढीच राहिली. याचा अर्थ तिची २३०९१ मते यावेळी घटली.बोईसर विधानसभा मतदारसंघात बविआची ६४५५० मते होती. तिथे विलास तरे हे विजयी झाले होते. परंतु या निवडणुकीत तिला फक्त ४७५४ मते पडली. म्हणजे तिची मते ५९७९६ एवढी घटली. शिवसेनेला ५१६७१ मते पडली होती. ती या निवडणुकीत ४९९९१ एवढीच पडली. म्हणजे तिची १६८० मते कमी झाली. तर भाजपाला ३०२२८ मते होती. तर यावेळी ४१६३२ मते पडली याचा अर्थ तिची ११४०४ मते वाढली. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बविआची ११३५६६ एवढी मते गेल्या विधानसभा निवडणुकीत होती. परंतु तिला या निवडणुकीत ७९१२४ एवढीच मते पडली. म्हमजे तिच्या मतात ३४४४२ ची घट झाली आहे. तर भाजपाला येथे ५९०६७ मते मिळाली होती. ती यावेळी ३७६२३ झाली. म्हणजे तिची २१४४४ एवढी मते घटली तर शिवसेनेची गेल्यावेळी ४०३२१ एवढी मते होती. ती यावेळी २७२६५ झाली. म्हणजे तिची १३०५६ मते घटली. याचा अर्थ मतदारांनी बविआला वसई, नालासोपारा, बोईसर या तिनही मतदारसंघात धोक्याचा इशारा दिला आहे. तर भाजपाला विक्रमगड आणि डहाणूत दिलासा दिला आहे. तर शिवसेनेला पालघरमध्ये धोक्याचा इशारा दिला आहे.