राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र जून कोरडाच गेलाच त्याची भरपाई जुलै महिन्यात भरुन काढल्याने समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु सप्टेंबरच्या मध्यापासून तालुक्यात पडणा-या सततच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडणीत सापडला होता, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने तालुक्यातील विक्रमगड व परिसरात हळव्या भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरुवात झाली आहे़त्यामुळे जर आता परतीचा पाऊस पुन्हा कोसळला तर तयार झालेले भातपिकाचे मोठयाप्रमाणवर नुकसान होणार आहे़ कारण शेतकरी कापलेले भात वाळविण्याकरीता शेतात कापून ठेवत असल्याने ते पुन्हा भिजल्यास तयार भाताला पुन्हा कोंब फुटून त्यांचे मोठे नुकसान होत होईल.यंदा तालुक्यात ७,५५८ अशा मोठया स्वरुपाच्या क्षेत्रावर हळवे,निमगरवे,गरवार भातपिकाची लागवड करण्यांत आली असून हळवे भातपिक ९० दिवसांत तयार झालेले असल्याने सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरातील आंबेघर, बालापूर, दादडे, शेलपाडा, खडकी, सारशी, अंधेरी, ओंदे, विक्रमगड अशा आदीविध भागातील शेतक-यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे. दसरा उत्सव पार पडल्यानंतर आपआपल्या सवडीनुसार व मनुष्यबळानुसार शेतकरी तिला सुरु करतातच़यंदाच्या लागवड क्षेत्रात हळवा भाताची रोपणी वेळेवर झाल्यामुळे दर्जेदार रोपे आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ परंतु यंदा पाउस लांबल्यामुळे काही शेतकºयांच्या भातावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता (ज्या शेतक-यांनी उशिराने भात लागवड) केली अशा). दरम्यान आतापर्यत तालुक्यात जून ते सप्टेेंबर अखेरीस एकुण सरासरी तीन हजार मि़मि़ पेक्षा जास्त पावसाची नोंद तहसिल कार्यालयात करण्यात आली आहे़
विक्रमगडात हळव्याच्या कापणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:11 AM