वसई : पोलीस दलाच्या ’रायझींग डे विक’ला म्हणजे स्थापना सप्ताहाला सुरूवात झाली आहे. तो पुढील आठवडाभर सुरु असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या व विद्यार्थ्याच्या मनातील पोलीसांबद्दलची भीती जावी व पोलीस ठाण्यांचे कामकाज कसे चालते? याची माहिती व्हावी म्हणून हा उपक्र म राबवण्यात येत असतो.वसई तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांत २ ते ८ जानेवारी पर्यंत हा सप्ताह साजरा होणार आहे. यानिमित्त शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पोलीस ठाण्याचा कारभार कसा चालतो व प्रत्येक विभाग कसे काम करते, गुन्ह्यांचा तपास कसा होतो, पोलिस कर्मचाºयांची माहिती, कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा, पोलीस अधिकाºयांबद्दलची माहिती, यात सांगण्यात येणार आहे.दोन जानेवारीपासून हा उपक्र म सुरु झाला असून पहिल्याच दिवशी विवा कॉलेजचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांंना विरार पूर्व पोलीस ठाणे दाखविण्यात आले. या उपक्रमात पोलीस स्वत: शाळा व कॉलेज मध्ये जाऊन ‘से नो टू ड्रग्स’ मुलींची सुरक्षितता’ ‘डोमेस्टिक व्हायोलंस इ. बद्दल मुलांना माहिती देणार आहेत. विद्यार्थ्यांंनी पोलिसांना न घाबरता त्यांच्याशी संवाद साधावा या करिता हा उपक्र म राबवण्यात आला.रायझींग डे निमित्ताने सर्व पोलिस ठाण्यांतर्गत विविध उपक्र म राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस हे जनतेचे मित्र आहेत, ही भावना जेव्हा सर्वसामान्यांमध्ये रूजेल तेंव्हाच हे अभियान यशस्वी होईल.- विजयकांत सागर, अप्पर पोलिस अधिक्षक, वसई
पोलीस ‘रायझिंग डे’ला उत्तम प्रतिसाद; कुठे मिरवणूका तर कुठे अधिकाऱ्यांची व्याख्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:17 AM