पालघर : अत्यंत चुरशीने लढविल्या गेलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित हे २९,५७२ मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना २,७२,७८२ मते मिळालीत तर शिवसेनेचे उमेदवार आणि ज्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली ते चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना २,४३,२१० मते मिळाली तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि माजी खासदार बळीराम जाधव यांना २,२२,८३८ मते मिळाली.अत्यंत कडेकोट बंदोबस्तात आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू झाली, त्यात राजेंद्र गावित आघाडीवर होते. ती आघाडी त्यांनी प्रत्येक फेरीत हळूहळू वाढवत नेली. पहिल्या फेरीपासून ते आघाडीवर होते. या फेरीत बविआचे बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते तर वनगा तिसºया क्रमांकावर होते. नंतर मात्र वनगा यांनी आघाडी वाढविली आणि तिसºया स्थानावरून दुसºया स्थानावर झेप घेतली. परंतु त्यांना गावितांचा लीड काही तोडता आला नाही.मतमोजणीच्या प्रारंभी पोस्टल बॅलेट मोजणीचा आणि पहिल्या फेरीचा निकाल घोषित न झाल्याने पत्रकार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. जेवढी मोजणी झाली तिचा निकाल जाहीर का करत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर निवडणूक यंत्रणेकडे नव्हते. नंतर मात्र मतमोजणी होताच तिचा निर्णय झटपट जाहीर होऊ लागला. मोजणीच्या वेळीही प्रत्येक पक्षाच्या प्रभाव क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रात तिथे जोर असलेल्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून आले. नालासोपाºयात बविआचे बळीराम जाधव आघाडीवर होते. डहाणूत राजेंद्र गावित आघाडीवर होते.लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या ११ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये केंद्रात व अनेक राज्यांत सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभवाचा जोरदार झटका बसला आहे. भाजपाला विधानसभेच्या ११ पैकी एक जागा जिंकता आली. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका असताना पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.गोंदिया-भंडारामध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी भाजपाचे हेमंत पटले यांचा ४८ हजार मतांनी पराभव केला. कुकडे यांना ४ लाख ४२ हजार २१३, तर पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ मते मिळाली. येथून २0१४ साली भाजपाचे नाना पटोले जिंकले होते. काँग्रेसमध्ये जाताना त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली.पालघर अत्यंत चुरशीने लढविल्या गेलेल्या पालघरमध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले राजेंद्र गावित २९,५७२मतांनी विजयी झाले. त्यांना २,७२,७८२; तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २,४३,२१० मते मिळाली. बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना २,२२,८३८ मते मिळाली. काँग्रेस पाचव्या क्रमांकावर गेला.
भाजपाला जोर का झटका : भंडारा-गोंदिया राष्ट्रवादीकडे,पालघर राखण्यात यश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:37 AM