लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : तलासरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने भात रोपं वाहून गेली आहेत. अनेक गाव पाड्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहील्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. सुरवातीच्या पावसात व विहीरीच्या पाण्याचा वापर करुन पेरणी केलेल्याची रोपे तयार झाली असलेल्यांनी भात लावणी सुरू केली असल्याने अशा शेतकऱ्यांनी बांधलेले गणित यशस्वी ठरतांना दिसत आहे.तालुक्यात भातलागवडी खाली ९७७४.४२ हेक्टर क्षेत्र असून ६.४५ हेक्टर क्षेत्रावर कड धान्य, बागायत ३०८.८० हेक्टर, फुलशेती ७ हेक्टर असून तालुक्यात ९४८८ खातेदार शेतकरी तर १२४६ भूमिहीन मजूर आहेत. तालुका कृषी विभागामार्फत तालुक्यात ४४ हेक्टर वर भात पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले तर बांधावर तूर लागवडीसाठी कृषी विभागाकडे ५५ किलो बियाणे उपलब्ध झाले आहेत. तसेच ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम २०१७’ अंतर्गत कृषी विभागाच्या प्रचिलत योजनेतून कृषी यांत्रिकीकरणसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी ६० टक्के तर खुल्या वर्गासाठी ४० टक्के अर्थ सहाय्य लाभार्थी शेतकऱ्याला देण्यात येणार आहे.
संततधारेने भातरोपे गेली वाहून
By admin | Published: July 03, 2017 5:59 AM