शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

खाचरातील भातरोपे कुजली

By admin | Published: July 23, 2015 4:15 AM

पावसाने महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु काही गावांमध्ये

वसई : पावसाने महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भाताची रोपे आडवी झाली. महिनाभर पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खाचरात पाणी साचून राहिल्यामुळे भाताची रोपे कुजण्याची भीती व्यक्त होत आहे.दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे नुकसानही होण्याची भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. पावसाने आता थोडी उसंत घेतली तरच, भातशेतीची पुढील कामे करण्यासाठी शेतकरीवर्ग सज्ज होऊ शकेल. गेल्या २४ तासांत उपप्रदेशात वसई येथे २०० मिमी, मांडवी- १८७ मिमी, विरार- १४९ मिमी, आगाशी- ९५ मिमी, माणिकपूर व निर्मळ प्रत्येकी - १७६ मिमी पाऊस झाला.गेल्या १९ जूनला अशीच मुसळधार वृष्टी झाली होती. त्यानंतर, मात्र पावसाने काढता पाय घेतला होता. यंदाही संपूर्ण महिना कोरडा गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. महिनाभर पाऊस न झाल्यामुळे सुका दुष्काळ निर्माण होतो की काय, अशी भीती वाटत असतानाच गेल्या ३ दिवसातील मुसळधार वृष्टीमुळे शेतकरीवर्गात आता ओला दुष्काळ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.पालघर : भरपावसात मोटारसायकलवरून पालघरला कामावर जात असताना कडूनिंबाचे झाड अंगावर कोसळून झालेल्या अपघातात प्रकाश माळी (४५), रा. सातपाटी हे जागीच ठार झाले. शिरगाव, आंबेडकरनगरजवळील रस्त्याच्या कडेला झालेल्या अपघाताची सातपाटी पोलिसांनी नोंद केली आहे.सातपाटीच्या शेगटपाड्याजवळ राहणारे प्रकाश माळी आज सकाळी ९ च्या दरम्यान पालघरमधील आनंदाश्रम कॉन्व्हेंट स्कूलच्या पाठीमागे असलेल्या औद्योगिक परिसरातील एका कारखान्यात जात होते. त्यांची मोटारसायकल शिरगावच्या आंबेडकरनगरजवळ आली असताना एका खाजगी बागायतदाराच्या बागेत असलेले कडूनिंबाचे झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली सापडून प्रकाश माळी यांचा मृत्यू झाला. तलासरी : तालुक्यातील मौजे गिरगाव-आरजपाडा येथील एका आदिवासी शेतकऱ्याचा नदीकिनारी कोसळलेल्या दरडीखाली दबल्याने मृत्यू झाला. तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा हा पहिला बळी ठरला आहे. तलासरी तहसीलदार गणेश सांगळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गिरगाव येथून वाहत जाणारी वरोळी नदी व तिला येऊन मिळणारा गावातील ओढा, या ठिकाणी गिरगाव-आरजपाडा येथील आदिवासी शेतकरी नवशा हरजी ठाकरे (५५) शेतीकामासाठी गेले असता नदीकिनाऱ्याची मातीची दरड कोसळल्याने त्या दरडीखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सतत दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदी व ओहोळांना पूर आल्याने नदीकिनाऱ्यांलगतची माती वाहून गेल्याने किनाऱ्यांलगतची जमीन भुसभुशित झाल्याने हा अपघात घडला.विक्रमगड : तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात १६५८ हेक्टरवर भातलागवड केली जात असून काही शेतकऱ्यांच्या शेतांत पाणी तुंबल्याने भातलावणीचाही खोळंबा झाला आहे. तालुक्यात सरासरी ९३ मिमी पावसाची नोंद झाली असून विहिरी, नाले, नद्या तुडुंब भरले आहेत. पूरपरिस्थिती नसून जनजीवन सुरळीत आहे. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत लावणीची ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला.कासा : डहाणू तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पेठजवळील सूर्या नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. तालुक्यात सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सूर्या नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे पेठजवळील सूर्या नदीवरील बंधारा पद्धतीचा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे परिसरातील उर्से, पेठ, म्हसाड, आंबिवली, साये, नानिवली, धामटणे आदी गावांतील संपर्क तुटला होता. त्यामुळे बोईसरकडे जाणाऱ्या नागरिकांना व चाकरमान्यांना १० किमी जास्त अंतर पार करून चारोटीमार्गे जावे लागते. या पुलाची उंचीही कमी आहे तसेच तो अरुंद आहे. त्यामुळे उंची व रुंदी वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.