भिवंडी: वळ ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या जे ई मेकॅनिकल कंपनीत लोखंड कापण्याचे काम करीत असताना नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट होऊन झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे . या घटने बुधवारी दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते . मात्र यातील गंभीर जखमी युवकाचा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला असल्याने मृतांचा आकडा तीन वर पोहचला आहे तर जखमी असलेल्या तिघांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्पेश भोईर असे मृत्यू झालेल्या तिसऱ्या कामगारांचे माव असून त्यास उपचारासाठी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र रात्री उपचारादरम्यान अल्पेशचा मृत्यू झाला आहे .
तालुक्याच्या ग्रामीण भागात असंख्य गोदमातून असे अनधिकृत व्यवसाय उद्योग चोरी छुपे कोणत्याही शासकीय परवाणग्यांशिवाय सुरू असून त्याकडे संबंधित शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे हे अवैध उद्योग सुरू असताना त्याची नोंद कोणत्याही शासकीय यंत्रणे कडे नसल्याने अशा दुर्घटना झाल्या नंतर फक्त चर्चा होते परंतु कोणतीही कारवाई होत नाही . त्यामुळे येथील व्यावसायिकांचे फावते आहे. मात्र अशा दुर्दैवी घटनेत निष्पापांचे बळी जात असून त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे .
दरम्यान कामगार युवकांच्या मृत्यूस कंपनी मालक व व्यवस्थापक जबाबदार असून जे ई मेकॅनिकल कंपनी व्यवस्थापना वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत कामगार हे युवक असल्याने त्यांच्या कुटुंबियां वर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी नगरसेवक निलेश चौधरी यांनी भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तर या कंपनीत स्टील कटिंग करण्याचे काम करीत असताना प्रमाणा पेक्षा जास्त नायट्रोजन गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला असल्याचे समोर आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅस साठा करण्याचा परवाना कंपनी कडे होता का , कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व उपाय योजना केली होती का त्यामुळे या कामगारांच्या जीवाशी कंपनी मालक खेळत असून त्यातूनच तीन निष्पाप कामगारांचा जीव गेल्याने कंपनी मालक विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील निलेश चौधरी यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.