शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

वसईत नाशिकची पुनरावृत्ती टळली; ऑक्सिजन प्लांटमधील गळती वेळीच रोखली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 4:03 PM

Oxygen plant leakage : सर्व ऑक्सिजन हवेतच मिसळला आणि मोठी दुर्घटना टळली

आशिष राणे

वसई -  येथील ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटल व त्याठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यासाठी मागील वर्षी पालघर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी सक्षम आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करीत वसईतील जी जी कॉलेजमध्ये कोविड रुग्णालय व सोबत ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली होती.त्यासाठी याठिकाणी दोन मिनी ऑक्सिजन प्लांट ही बसविण्यात आले होते. मात्र, याच मिनी ऑक्सिजन प्लांट ला रविवारी (दि.१६ ) सकाळी ९ च्या सुमारास अचानक गळती सुरू  झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ही गळती झाल्यानंतर महसूल विभागाची  एकच धावपळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. 

या संदर्भात वसई प्रांताधिकारी यांना संपर्क केला असता तो झाला नाही. नशीब बलवत्तर म्हणून सदरचा ऑक्सिजन गळती प्रकाराची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांना समजताच त्यांनी जरा ही विलंब न करता तात्काळ खबरदारी घेत ऑक्सिजन संदर्भात तांत्रिकदृष्ट्या देखभाल दुरुस्ती करणारे  इलेक्ट्रिशनची टीम घेऊन घटनास्थळ गाठलं व या सिलेंडर मधील ही गळती थांबवली. 

दरम्यान मागील चार ते पाच महिन्यापासून हे कोविड सेंटर रुग्णालय बंद स्थितीत असून याठिकाणी मात्र ऑक्सिजन मिनी प्लांट जैसें थे स्थितीत होता. मात्र अचानकपणे दोन्ही मिनी प्लांटमधून गळती झालेला हा ऑक्सिजन हवेतच मिसळून गेल्याने वसईतील मोठी दुर्घटना घडता घडता राहिली असल्याचा दावा महसूल प्रशासनाने केला आहे.  

 

 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारOxygen Cylinderऑक्सिजनcollegeमहाविद्यालय