वाडा : आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस तसेच वादळी वाºयाने झोडपून काढल्याने केळी उत्पादक शेतकरी आणि भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गांधरे येथील आत्माराम भोईर या शेतकºयाने सहा एकर जागेत केलेल्या केळीची लागवडीचे संपूर्ण नुकसान झाले आहे.या शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळण्याची मागणी शांती दूध ग्रुप फार्मिंगने केली आहे.दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकºयांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शांतीदूत ग्रुप फार्मिंगचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील बहुसंख्य शेतकरी शेती करतात. शेतीबरोबरच आता इतरही पिके घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. यात केळी, आले, बटाटा, कांदा, कोबी, फ्लॉवर, ऊस, हळद, टोमॅटो आदी पिके घेण्याचा प्रयत्न येथील शेतकरी चार-पाच वर्षापासून करीत असून या पिकांचे उत्पादनही येथे चांगल्या पद्धतीने होते आहे.
वाड्यात केळी आणि भातशेतीचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:17 PM