नालासोपारा : नालासोपाऱ्यातील सत्पाळा परिसरात सोमवारी मोठी आग लागली. यावेळी मोठे नुकसान झाले. दोन दुकानं यात जळाली आहेत. आग विझविण्यास अग्निशमनदलाला एक तास लागला सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
वसई विरारमध्ये वर्षाच्या सुरवातीलाच ही मोठी आग लागली आहे. आग लागू नये यासाठी अनेक उपाययोजना केल्या तरी आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुपारी १२ वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली तेव्हा त्या ठिकाणी नालासोपाºयातील अग्निशमन दलाची गाडी मागविण्यात आली. आगीचे स्वरूप भीषण असल्यामुळे खासगी टँकर देखील मागवावा लागला. एक तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश आले. वर्षाव हाउस आणि ए वन सेल्स अँड सर्व्हीस हि दोन दुकाने जळाली व त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
आग विझविल्यानंतर कुलिंग आॅपरेशन सुरु झाले व ते बºयाच वेळ सुरु होते. आग लागल्याचे कारण अजूनही कळले नाही. पण इन्व्हर्टरमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमनदलाकडून सांगण्यात येत आहे.गेल्या वर्षी आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले होते त्यामुळे आग न लागावी व ती कशी नियंत्रणात आणावी यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही आगीच्या मोठ्या घटना घडत आहेत. याबाबत अग्निशमन दलाने नागरिकांचे समुपदेशन करण्याची गरज आहे.
आग बरीच मोठी होती त्यामुळे ती नियंत्रणात आणण्याकरिता बराच वेळ लागला. खासगी टँकर मागवावा लागला. जीवित हानी झाली नसली तरी सामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे. तिचे निश्चित कारण तपासाअंती कळू शकेल- विशाल शिर्के, अग्निशमन दलवसई महापालिका